आचारसंहितेच्या बैठकीकडे राजकीय पक्षांची पाठ
By admin | Published: January 17, 2017 12:01 AM2017-01-17T00:01:00+5:302017-01-17T00:01:18+5:30
उदासीनता : छोट्या पक्षांच्या प्रतिनिधींची हजेरी; मनपा आयुुक्तांच्या सूचना
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेची माहिती देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. परंतु, प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्याकडे पाठ फिरविली. काही राजकीय पक्षांनी आपल्या दुय्यम फळीतील कार्यकर्त्यांना बैठकीसाठी पाठविले, तर छोट्या पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीला आवर्जून हजेरी लावली. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीत आयुक्त अभिषेक कृष्ण, आचारसंहिता कक्ष प्रमुख सरीता नरके, सह निवडणूक अधिकारी विजय पगार यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. यावेळी आयुक्तांनी सांगितले, निवडणुकीत कोणालाही धर्म आणि जातीच्या आधारावर मते मागता येणार नाहीत.