युती अन् आघाडीचे राजकारण अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:11+5:302021-08-22T04:17:11+5:30

सटाणा पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन व हुतात्मा स्मारक नूतनीकरण कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त शहरातील दगाजी ...

The politics of alliance and alliance is inevitable | युती अन् आघाडीचे राजकारण अपरिहार्य

युती अन् आघाडीचे राजकारण अपरिहार्य

Next

सटाणा पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन व हुतात्मा स्मारक नूतनीकरण कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त शहरातील दगाजी चित्रमंदिरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मंत्री झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गानुसार देशातील अठरापगड जातींचा उत्कर्ष होत असल्याचे सांगितले.

यावेळी आठवले यांनी नेहमीच्या शैलीत नगराध्यक्ष मोरे यांच्या विकासकामाविषयी वेगवेगळ्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे होते. शहराचा चेहरा बदलण्याचे काम नगराध्यक्ष मोरे यांनी केले असून, आगामी काळात विकासासाठी शहरवासीयांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन आमदार बोरसे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक करताना नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष उत्तम भामरे, शाहीर भीमराव पवार यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी, तर आभार महेश देवरे यांनी मानले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, उद्योजक शंकर सावंत, गटनेते महेश देवरे, नितीन सोनवणे, राकेश खैरनार, दिनकर सोनवणे, संगीता देवरे, राहुल पाटील, शमा मन्सुरी, उपसभापती सुवर्णा नंदाळे, नगरसेवक सुरेखा बच्छाव, बाळू बागुल, सुनीता मोरकर, भारती सूर्यवंशी, शमीम मुल्ला, आशा भामरे, दत्तू बैताडे, शफीक मुल्ला, नाना मोरकर, हेमंत पाटील, दीपक सोनवणे, माजी नगरसेवक मनोज वाघ, दोधा मोरे, आरिफ मन्सुरी, रिपाइंचे दिलीप सोनवणे, किशोर सोनवणे, भारत बच्छाव, जितेंद्र पवार, पोपट बच्छाव, सागर शेलार, संजय पवार, प्रकाश बच्छाव, वैभव गांगुर्डे, मुख्याधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थित होते.

(२१ सटाणा)

सटाणा येथे पालिकेच्या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले. समवेत दिलीप बोरसे, सुनील मोरे, प्रकाश लोंढे आदी.

210821\21nsk_22_21082021_13.jpg

सटाणा येथे पालिकेच्या कार्यक्रमात बोलतांना रामदास आठवले समवेत दिलीप बोरसे, सुनील मोरे, प्रकाश लोंढे आदी.

Web Title: The politics of alliance and alliance is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.