संशयास्पद बांधकाम नियंत्रण नियमावलीवरही राजकारण

By admin | Published: February 11, 2017 12:31 AM2017-02-11T00:31:53+5:302017-02-11T00:32:04+5:30

भाजपा म्हणते बनावट : जाधवांची त्यावरही टीका

Politics on suspicious construction control rules | संशयास्पद बांधकाम नियंत्रण नियमावलीवरही राजकारण

संशयास्पद बांधकाम नियंत्रण नियमावलीवरही राजकारण

Next

 नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झालेल्या बांधकाम नियमावरून आता राजकारण सुरू झाले आहे. भाजपाला बदनाम करण्यासाठी हे षड््यंत्र असल्याची टीका करतानाच आमदार बाळासाहेब सानप यांनी नियमावली अद्याप मंजूर नसल्याचा दावा केला. दुसरीकडे संशयास्पद असलेल्या या नियमावलीला खरे गृहीत धरून राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी थेट टीका केली आहे. त्यामुळेच ही नियमावली राजकारणात अडकल्याचे दिसून येत आहे.
शहर विकास आराखड्याचा पहिला टप्पा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंजूर झाला. परंतु बांधकाम नियंत्रण नियमावलीच मंजूर झाली नाही ती स्वतंत्रपणे मंजूर केली जाईल, असे विकास आराखडा प्रसिध्द करताना शासनाने म्हटले होते. तर बांधकाम नियंत्रण व विकास नियमावली प्रसिध्द करण्यासाठी राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. आता निवडणुकीच्या रणधुमाळीत व्हॉट्स अ‍ॅपवर नियमावली व्हायरल झाली. गुरुवारी ही फाईल व्हायरल झाली असून, २०६ पानांच्या नियमावलीच्या शेवटी कोणाचाही स्वाक्षरी नाही. त्यामुळे ही नियमावली खरी की खोटी या विषयावर संशय आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीदेखील नियमावलीत मंजुरीची अधिकृत प्रत नसल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी अद्याप नियमावली मंजूर नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भाजपाला अडचणीत आणण्यासाठी ही खेळी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे ही नियमावली खरी किंवा खोटी याबाबत संशयास्पद आहे. असे असताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी आराखड्यावर टीका केली असून, या नियमावलीतील तरतुदी म्हणजे सर्वसामान्य नाशिककरांवर सरकारने न कळत टाकलेला दरोडा असल्याचे म्हटले आहे.
जाधव यांच्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संशयास्पद नियमावलीवर राष्ट्रवादीने राजकारण सुरू केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Politics on suspicious construction control rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.