पिंपळगाव मोर येथे शौचालयावरून राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:49 AM2018-04-24T00:49:29+5:302018-04-24T00:49:29+5:30

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी चक्क ‘शौचालयाचा’ वापर करण्यात आला. विद्यमान पॅनल अल्पमतात आणण्यासाठी तीन सदस्यांना शौचालयाअभावी अपात्र ठरविण्याची खेळी करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधितांची शौचालये ही कागदोपत्री गायब करण्यात आली असून, आता अपात्र ठरविण्यात आलेले सदस्य जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाईची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

 Politics from the toilets at Pimpalgaon More | पिंपळगाव मोर येथे शौचालयावरून राजकारण

पिंपळगाव मोर येथे शौचालयावरून राजकारण

googlenewsNext

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी चक्क ‘शौचालयाचा’ वापर करण्यात आला. विद्यमान पॅनल अल्पमतात आणण्यासाठी तीन सदस्यांना शौचालयाअभावी अपात्र ठरविण्याची खेळी करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधितांची शौचालये ही कागदोपत्री गायब करण्यात आली असून, आता अपात्र ठरविण्यात आलेले सदस्य जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाईची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.  सुमन युवराज गातवे, उमेश लालू बेंडकोळी आणि जीवन नामदेव गातवे अशी अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत. उपोषणास बसलेल्या सुमन गातवे यांनी सांगितले की, २०१४ च्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही निवडून आलो होतो. त्याचवेळी आमच्याकडे शौचालये असून, त्याचा वापर करीत असल्याचा अभिप्राय गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दिला होता. त्याच बळावर आपण निवडणूकही जिंकली. २०१५ आणि २०१८ मध्येही ग्रामपंचायतीने शौचालय असल्याचा दाखला दिला आहे.
याप्रकरणी राजकीय फायद्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी विसंगत आणि खोटे दाखले दिल्याचा आरोप करीत सुमन गातवे यांच्यासह उमेश बेंडकोळी, जीवन गातवे, दत्तू काळे, शिवाजी काळे, पंढरीनाथ काळे, राजाराम काळे, जगन बेंडकोळी, किरण डगळे, युवराज गातवे, श्यामराव कुलाळ, बाळसाहेब माळी या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांची भेट घेऊन दोन्ही अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली.  याप्रकरणी गिते यांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही तोपर्यंत उपोेषण सुरूच ठेवण्याचा इशारा सुमन गातवे यांनी दिला आहे.  १८ नोव्हेंबर रोजी गातवे यांच्या विरोधातील तीन सदस्यांनी जिल्हाधिकाºयांकडे विवाद अर्ज दाखल करून गटविकास अधिकारी किरण जाधव आणि ग्रामसेवक वर्षा घिसाडी यांनी दिलेला शौचालय नसल्याचा अभिप्राय जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकाºयांनी घेतली तेव्हा सुमन गातवे, उमेश बेंडकोळी आणि जीवन गातवे यांनी संबंधित अधिकाºयांनीच आपणाला शौचालय असल्याचा दिलेला दाखल सादर केला. गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दिलेला विसंगत अहवाल पाहून जिल्हाधिकाºयांनी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश उभयताना दिले होते. मात्र त्यांनी मुदतीत अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी वरील तीनही सदस्यांना अपात्र ठरविल्यामुळे विरोधकांनी सरपंच, उपसरपंचांची निवडणूक जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे.

Web Title:  Politics from the toilets at Pimpalgaon More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.