पालिकेचे सर्वेक्षण : शिवसेना गटनेत्याच्या प्रभागात सर्वाधिक प्रमाण५८ टक्के कुटुंबांकडून कचºयाचे वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:12 AM2017-09-29T00:12:10+5:302017-09-29T00:12:22+5:30

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकणे नागरिकांना अनिवार्य करण्यात आल्यानंतर शहरातील सुमारे ५८ टक्के कुटुंबीयांकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Poll survey: 58 percent of households in the Shiv Sena group leader's classification | पालिकेचे सर्वेक्षण : शिवसेना गटनेत्याच्या प्रभागात सर्वाधिक प्रमाण५८ टक्के कुटुंबांकडून कचºयाचे वर्गीकरण

पालिकेचे सर्वेक्षण : शिवसेना गटनेत्याच्या प्रभागात सर्वाधिक प्रमाण५८ टक्के कुटुंबांकडून कचºयाचे वर्गीकरण

Next

नाशिक : घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकणे नागरिकांना अनिवार्य करण्यात आल्यानंतर शहरातील सुमारे ५८ टक्के कुटुंबीयांकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. नाशिक पश्चिम व पंचवटी विभागातून अद्यापही बव्हंशी कुटुंबीयांकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, महापौरांच्या प्रभागातील ४८ टक्के कुटुंबीय कचºयाचे वर्गीकरण करत आहेत, तर शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या प्रभागातील सर्वाधिक ९३ टक्के कुटुंबीय कचºयाचे वर्गीकरण करत आहेत. आता उर्वरित ४२ टक्के कुटुंबीयांनाही कचरा वर्गीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
महापालिकेने खतप्रकल्प खासगीकरणातून चालविण्यास दिला असून, जानेवारी २०१७ पासून खासगी कंपनीद्वारा तो कार्यान्वित झाला आहे. सध्या खतप्रकल्पावर सुमारे ५२५ टन कचरा येत आहे. खतप्रकल्पावर ओला व सुका कचरा वेगळा करत त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आहे. तसेच महापालिकेने घंटागाडीचा नव्याने ठेका देताना ठेकेदारांनाही घंटागाडीत ओला व सुका कचरा यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, जवळपास सर्वच घंटागाडी ठेकेदारांनी ओला व सुका कचºयाच्या संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मुळात नागरिकांनीच घंटागाडीत कचरा टाकताना तो ओला आणि सुका असा वेगळा करून द्यायचा आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वतंत्र दोन डस्टबिन ठेवणे अनिवार्य आहे. बव्हंशी नागरिकांकडून एकत्रित कचराच घंटागाडीत टाकला जातो. त्यात शिळ्या अन्नपदार्थापासून ते घरातील भंगार साहित्य, जुने कपडे, प्लॅस्टिक पिशव्या व बाटल्या यांचा समावेश असतो.

Web Title: Poll survey: 58 percent of households in the Shiv Sena group leader's classification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.