मालेगाव तालुक्यात २० जागांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:20 AM2018-02-27T00:20:33+5:302018-02-27T00:20:33+5:30

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून, यासाठी मतदान केंद्रांवर कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत. २० जागांसाठी १२ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 Polling for 20 seats in Malegaon taluka today | मालेगाव तालुक्यात २० जागांसाठी आज मतदान

मालेगाव तालुक्यात २० जागांसाठी आज मतदान

Next

मालेगाव : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून, यासाठी मतदान केंद्रांवर कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत. २० जागांसाठी १२ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  १२ ग्रामपंचायतींसाठी १७ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. ३५ ग्रामपंचायतींच्या ६४ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. अर्ज छाननी, माघारीच्या प्रक्रियेनंतर १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील झोडगे, नाळे, लेंडाणे, दसाणे, साजवाळ, पळासदरे, वºहाणे, ज्वार्डी, निमगाव, करंजगव्हाण, नगाव दी., लोणवाडे आदी ठिकाणी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. यासाठी १७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. एका मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, तीन सहायक मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलीस कर्मचारी राहणार आहेत, तर ३० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. सोमवारी १२ वाहनांद्वारे कर्मचारी व मतदान साहित्य केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी मतदान प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेत नियुक्त कर्मचाºयांना मतदान प्रक्रियेसंबंधी सूचना दिल्या. २० जागांसाठी १२ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात सहा हजार २७० पुरुष, तर ५ हजार ७८० स्त्री मतदारांचा समावेश आहे. २८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.

Web Title:  Polling for 20 seats in Malegaon taluka today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.