इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 02:19 PM2019-03-24T14:19:15+5:302019-03-24T14:19:20+5:30
घोटी : उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी सकाळी केंद्रांवर झालेली गर्दी.. अशा वातावरणात इगतपुरी तालुक्यातील२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रि या ...
घोटी : उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी सकाळी केंद्रांवर झालेली गर्दी.. अशा वातावरणात इगतपुरी तालुक्यातील२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रि या शांततेत सुरू आहे. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम झाल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. आतापर्यंत ५५ टक्के पेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज आहे.
या निवडणुकीच्या निमित्त े काही मतदारांनी पाणीटंचाईची समस्या तात्पुरती सोडवून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. टंचाईसदृश गावात विहिरीत टँकरने पाणी आणून टाकणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासन मतदारांनी दिले.
तालुक्यातील ७७ केंद्रावर प्रत्येकी ५ या प्रमाणे जवळपास ४६० अधिकारी-कर्मचारी मतदानाची जबाबदारी पार पाडत आहेत. मतदान प्रक्रि या शांततेत पार पडावी यासाठी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, घोटीचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, वाडीवº्हेचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त कार्यरत आहे. इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे मतदान प्रक्रि येचा आढावा घेत आहेत.
उद्या मतमोजणी
इगतपुरी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी करण्यात येईल. एकावेळी २ ग्रामपंचायतींची मोजणी होईल. ज्यांची मोजणी आहे त्या गावातील उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनाच मोजणीवेळी प्रवेश मिळेल. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील असा अंदाज आहे.
छायाचित्र
इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी लागलेली रांग(२४इगतपुरी इलेक्शन)