१५ जानेवारीला कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:07 AM2020-12-14T00:07:10+5:302020-12-14T01:18:04+5:30

कळवण : तालुक्यातील अभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी गटातटात, भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात निवडणूक होणार आहे.

Polling for 29 gram panchayats in Kalvan taluka will be held on January 15 | १५ जानेवारीला कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान

१५ जानेवारीला कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देअभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर येथील रणांगणात चुरस

कळवण : तालुक्यातील अभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी गटातटात, भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात निवडणूक होणार आहे.

या पार्श्वभूमीवर गावाचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर ज्येष्ठ मंडळी प्रयत्नशील आहेत. युवावर्गात मात्र निवडणूक लढविण्यासाठी बळ दिले जाणार असून, गावागावांत आता गटातटाचे राजकारण होणार आहे.
कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.
कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे बु., सप्तश्रृंगगड, नांदुरी, मेहदर, नरूळ, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, मोहनदरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, वीरशेत, वडाळे(हा), बोरदैवत, जामलेवणी, कळमथे, सावकीपाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे(क), काठरे, गोसराणे या महत्त्वपूर्ण गावांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

नामनिर्देशन पत्र ३० डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. १५ जानेवारीला मतदान -

कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायती निवडणुकांसाठी नामनिर्देशन दि. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत दाखल करता येणार आहे. शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल.

२५ सप्टेंबरच्या मतदार याद्या ग्राह्य धरणार-
विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत,

Web Title: Polling for 29 gram panchayats in Kalvan taluka will be held on January 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.