आयमा निवडणुकीसाठी २९ रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:21 AM2018-05-14T00:21:14+5:302018-05-14T00:21:14+5:30

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या गुरुवार (दि. १७) पासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 Polling for the AIMA elections on 29th | आयमा निवडणुकीसाठी २९ रोजी मतदान

आयमा निवडणुकीसाठी २९ रोजी मतदान

Next

सिडको : अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या गुरुवार (दि. १७) पासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने उद्योजक वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार आधीच घोषित करण्यात आले असून, इतर पदांसाठीचे उमेदवारदेखील लवकरच घोषित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.  आयमा पदाधिकाºयांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असून, आयमाच्या २०१८-२० या कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १७ तारखेपासून निवडणुकीस प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, त्यादृष्टीने सत्ताधारी एकता पॅनल व दुसºया गटाच्या उमेदवारांकडून हालचालींना वेग आला आहे. सदरची निवडणूक ही मागील निवडणुकीप्रमाणेच बिनविरोध करण्यासाठी आयमाच्या माजी पदाधिकाºयांकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु सत्ताधारी व दुसरा गट यांच्यात जर समझोता झाला नाही तर एकता पॅनलच्या दुसºया गटाकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार उद्योजक तुषार चव्हाण हे राहणार असून, यामुळे समझोता न झाल्यास अध्यक्षपदासाठी का होईना ही निवडणूक होईल, अशी चर्चा आहे. सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव आधीच जाहीर केल्याने दुसºया गटाने यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. यावर या दोन्ही गटांत समझोता करण्यासाठी माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापही समझोता झाला नसल्याचे समजते. आयमाची २०१८-२० या कालावधीसाठी येत्या २९ मे रोजी निवडणूक घेण्यात येणार असून, ३१ मे राजी नवीन अध्यक्ष पदभार स्वीकारणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केले आहे.
समझोता नाही
सत्ताधारी एकता पॅनलने वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले असल्याने दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण व त्यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली आहे. मागील निवडणुकीत अध्यक्षपदाचा शब्द दिला असतानाही पुन्हा डावलण्यात येत असल्याचा आरोप तुषार चव्हाण गटाकडून करण्यात येत असून, सत्ताधारी एकता गटाकडून मागील दोन वर्षांत संघटनेच्या कोणत्याही बैठका, तसेच इतर कामांसाठी कोणतेही योगदान दिलेले नसल्याने तुषार चव्हाण यांना अध्यक्षपद मागण्याचा अधिकार नसल्याची चर्चा आहे. यामुळे दोन्ही गटांत समझोता न झाल्यास अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:  Polling for the AIMA elections on 29th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.