श्री कालिका कॉम्प्लेक्स, माहेश्वरी भवन, कामटवाडे, मोहगावला आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:40+5:302021-07-10T04:11:40+5:30
‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं ...
‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी (दि. ९) सातपूरच्या ईएसडीएस कंपनीत २३, तर महापालिकेत नाशिक म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्यावतीने ५३ जणांनी रक्तदान केले. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या दोन रक्तदान शिबिरात मिळून एकूण ७६ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले आहे.
--------------
फोटो कॅप्शन (०९ईएसडीएस )
सातपूरच्या ईएसडीएस कंपनीत रक्तदानानंतर प्रमाणपत्र वितरित करताना संचालक पियुष सोमाणी.
---------------
फोटो ०९ सेना
नाशिक महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आणि संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, तसेच स्थायी समिती सभापती गणेश गिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोविड सेल प्रमुख आवेश पलोड यांनीही यावेळी मुख्यालयातील शिबिराच्या ठिकाणी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी सरचिटणीस राजेंद्र मोरे, विजय गवारे, नंदू गवळी, रवी येडेकर, रावसाहेब रूपवते, संजय गोसावी, सोमनाथ कासार, भूषण देशमुख, प्रकाश उखाडे, विशाल तांबोळी, जीवन लासुरे, तुषार ढकोलीया, विजय जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.