नासर्डी नदीपात्रात टळले प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:04 AM2017-09-07T01:04:23+5:302017-09-07T01:04:29+5:30

सातपूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी, ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सातपूर परिसरात ४८ हजार गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या असून, जवळपास ४५ टन निर्माल्य जमा झाले आहे.

 Pollution avoided in Nasardi river bed | नासर्डी नदीपात्रात टळले प्रदूषण

नासर्डी नदीपात्रात टळले प्रदूषण

Next

सातपूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी, ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सातपूर परिसरात ४८ हजार गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या असून, जवळपास ४५ टन निर्माल्य जमा झाले आहे.
गेल्या बारा दिवसांपासून घराघरांमध्ये विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महानगरपालिकेने सातपूर परिसरात नासर्डी नदी पूल, गंगापूर धबधबा, सोमेश्वर धबधबा, चांदशी पूल, मते नर्सरी पूल याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय केली होती. शिवाय पाइपलाइनरोड, अशोकनगर पोलीस चौकी, शिवाजीनगर सूर्यामर्फी चौक आदी ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. या कृत्रिम तलावातदेखील भाविकांनी ‘श्रीं’चे विसर्जन केले. सातपूर गावातील गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन केले. नासर्डी पुलाजवळ जनता विद्यालयाच्या १२० विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून विशेष कामगिरी बजावली.

Web Title:  Pollution avoided in Nasardi river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.