प्रदूषण महामंडळाने फोडले महापालिकेवर खापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:14+5:302021-06-11T04:11:14+5:30
महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्याच्या प्रेशरमुळे फेस तयार होत आहे. सांडपाणी प्रक्रिया ...
महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्याच्या प्रेशरमुळे फेस तयार होत आहे. सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर बायोलॉजिकल ट्रीटमेंट होते आणि फेनामीनामुळे आणि पाण्यातील बॅक्टेरियामुळे फेस तयार होतो. याबाबत काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील सब कमिटीची मीटिंग झाली आहे. त्यानुसार महानगरपालिका, निरी संस्था, एनजीओ, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी समितीने पाहणी केली आहे. महानगरपालिका ओझोनायजेशनच्या नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करीत आहे. फेस कमी कसा करता येईल? याबाबत एका ठिकाणी प्रयोग सुरू आहे. तसेच नागपूरच्या निरी संस्थेबरोबर टायअप करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करीत आहे.
इन्फो=== हा फेस डायरेक्ट डिस्चार्ज किंवा उद्योगांच्या रासायनिक पाण्यामुळे झालेला नाही. यापूर्वीही फेस झालेला आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी जास्त प्रेशरने नदीपात्रात सोडल्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणात झाला आहे. महानगरपालिकेने या फेसवर स्प्रे मारून तात्पुरती उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
- अमर दूरगुले, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ