प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृतीपर कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:10 AM2017-10-18T00:10:25+5:302017-10-18T00:10:31+5:30
मावळा सामाजिक प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर यांच्या वतीने प्रभाग क्र मांक २९ मध्ये स्वामी विवेकानंदनगर येथे ‘फटाक्यांचे दुष्परिणाम’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
सिडको : मावळा सामाजिक प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर यांच्या वतीने प्रभाग क्र मांक २९ मध्ये स्वामी विवेकानंदनगर येथे ‘फटाक्यांचे दुष्परिणाम’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. फटाके निर्मितीत वापरल्या जाणाºया रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. ध्वनिप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते. फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईडसारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो. या साºया दुष्परिणामांची नागरिकांना माहिती व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. याप्रसंगी वैभव देवरे व त्यांचे सहकारी, गणेश जाधव, तेजस्वी देवरे, गणेश जायभावे, मिलिंद भामरे, निखिल पवार, योगेश शेवाळे, मोहन काळे, संजय घोटेकर, श्रीकांत बोरसे, हरीश शर्मा, मयूर मिस्तरी, स्वामिनी ठाकरे, शमिका ठाकरे, सृष्टी शिरोडे, पूर्वल पाटील, चैताली पाटील आदी उपस्थित होते.