जानोरीत पॉलिहाउस कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:58 PM2020-06-06T20:58:14+5:302020-06-07T00:46:52+5:30
बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील शेतकऱ्यांचे पॉलिहाउस व नेटहाउसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.
जानोरी : बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील शेतकऱ्यांचे पॉलिहाउस व नेटहाउसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.
गुरुवारी (दि.३) निसर्ग चक्रीवादळाने जानोरी परिसरात वादळी वाºयासह मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे गुलाबाच्या पॉलिहाउस व नेटहाउसचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अगोदरच कोरोना महामारी रोगाने शेतकरी मेटाकुटीस आला असून, पिकवलेलं पीक बाजारात व मार्केटमध्ये विकता येत नाही. तरी पण शेतकरी हार न मानता आपला माल विकून दोन पैसे कमवायचा प्रयत्न करीत होता, पण या अचानक आलेल्या निसर्ग चक्र ीवादळाने लाखो रुपये खर्च करून उभे केलेले पॉलिहाउस व नेटहाउसचे मुसळधार पावसाने व वेगवान वाºयाने पॉलिहाउसचा प्लॅस्टिक कागद फाटून गेला आहे. तसेच नेटहाउसचे पण नेट फाटून गेल्याने त्यामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळाने जानोरी परिसरातील जगन दामू बोस या शेतकºयाने आपल्या घरची नाजूक परिस्थिती असल्यामुळे इकडून तिकडून पैसे जमा करून द्राक्षबाग उभी केली होती, परंतु या निसर्ग चक्रीवादळाने या शेतकºयांची द्राक्षबाग भुईसपाट झाल्याने जगन बोस यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
या परिसरातील शेतकºयांपुढे एक संकटाचा डोंगर उभा झाला आहे. या परिसरातील ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे त्या शेतकºयांचे पंचनामे कृषी विभागाच्या मनीषा पाटील, तलाठी गजकुमार पाटील, चेतन पाटेकर, हे प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करीत आहेत.