बहुरूपींना हवी लोककलावंताची मान्यता

By admin | Published: July 3, 2014 09:39 PM2014-07-03T21:39:22+5:302014-07-04T00:17:46+5:30

बहुरूपींना हवी लोककलावंताची मान्यता

Polymorphists want the recognition of folk artists | बहुरूपींना हवी लोककलावंताची मान्यता

बहुरूपींना हवी लोककलावंताची मान्यता

Next

 

वसंंत तिवडे

त्र्यंबकेश्वर
‘परंपरागत चालत आलेल्या लोककलांपैकी लोकांचे मनोरंजन करणारी कला म्हणजे बहुरूपी कला.’ या कलेला पूर्वी राजाश्रय होता, मात्र पिढ्या बदलत चालल्या आहेत. याकरिता शासनाने मानधन द्यावे व य्बहुरूपींना लोककलावंतांचा दर्जा द्यावा अशी मागणी या वर्गाकडून केली जात आहे.
बहुरूपी काय असतो हे आत्ताच्या पिढीला समजत नाही ते टर उडवितात. काही जाणकार मंडळी हसतात, प्रश्न विचारतात. १०-५ रुपये देतातही; मात्र त्यात बहुरूप्यांची अवहेलना, अपमान करूनच. त्यात आपुलकी, जिव्हाळा नसतो. थोडीफार सहानुभूती असते. येथे आलेले बहुरूपी भीमराव गंगाराम बाबर हे उद्वेगाने बोलत होते.आम्ही अजूनही ही कला जोपासून उदरनिर्वाह करीत आहोत. मात्र आता आमची मुले या क्षेत्रात येण्यास तयार नाहीत किंबहुना आमचीच त्यांना या व्यवसायात आणण्याची इच्छा नाही. त्यांनी खूप शिकावे, अशी आमची इच्छा आहे; पण आर्थिक परिस्थिती आड येते. शासकीय सवलतींचा लाभ वशिल्याशिवाय मिळत नाही. बहुरूपी सहसा पोलीस किंवा पोलीस अधिकाऱ्यांचे रूप घेऊन अचानक दारात येऊन उभा राहतो. ‘चला तुम्हाला पोलीस ठाण्यात बोलविले आहे. तुम्ही काल काय भानगड करून ठेवली आहे.’ ज्यांना माहीत आहे हा बहुरूपी आहे ते विनोदाने हसतात. पण ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांची मात्र विकेट उडते. त्यानंतर वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मात्र सर्वांना हसू फुटते. विनोदात्मक शैलीने लोकांचे मनोरंजन करणे, आपल्या कलेचा आविष्कार दाखवून लोकांची वाहवा मिळविणे. पोलिसी संवादातून विनोद निर्माण करणे म्हणजे बहुरूपी. याच पैशातून उदरनिर्वाह ही मंडळी करतात. सहसा नगर जिल्ह्यात या मंडळींचे वास्तव्य आहे. एखाद्या मुख्य शहरात आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास राहून पुरुष मंडळी दिवसभर खेडीपाडी तुडवितात. त्यांच्या व्यवसायाचे भांडवल म्हणजे जुना पोलिसी ड्रेस, एक डायरी आणि बोलण्याची कला होय. यातूनच ते उदरनिर्वाह करतात.

Web Title: Polymorphists want the recognition of folk artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.