शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंब बाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:52 PM2018-02-28T15:52:04+5:302018-02-28T15:52:04+5:30

Pomegranate Bagh Khak | शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंब बाग खाक

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंब बाग खाक

Next

चौगाव : दहा लाखांचे नुकसान, १२०० झाहे भक्ष्यस्थानी
सटाणा : तालुक्यातील चौगाव येथील शेतातून गेलेल्या विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सोमवारी (२६) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत माजी सरपंच लताबाई वसंत शेवाळे व भास्कर रतन शेवाळे यांच्या तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बाग पूर्णपणे जळून भस्मसात झाल्याने आठ ते दहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला. मात्र डाळिंब बागेतील सर्व १२०० झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने शेवाळे कुटुंबियांचे होत्याचे नव्हते झाले असून शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. लताबाई शेवाळे व त्यांचे दीर भास्कर शेवाळे यांनी चौगाव परिसरात भीमदरा शिवारातील बंद्या डोंगरालगत खडकाळ जमिनीवर गेल्या दीड वर्षांपूर्वी सपाटीकरण करून डाळींब बागेची लागवड केली होती. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून बेमोसमी पाऊस, गारपीट व बदलत्या तापमानामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पतीचे निधन झाले असताना माजी सरपंच लताबाई शेवाळे यांनी आपले सोने गहाण ठेऊन सात लाख रु पयांचे कर्ज घेतले होते. या पैशांवर त्यांनी शेतात विहिरीचे खोदकाम करून डाळिंब बाग उभारली.
अत्यल्प पावसामुळे बागेस पाणी देणे शक्य व्हावे यासाठी त्यांनी वेळप्रसंगी व्याजाने पैसे उचलले व टँकरने पाणी विकत घेऊन डाळिंब बाग जगविली. दीड वर्षांनंतर आज बहार धरण्याची वेळ आली असताना कष्टांना फळ मिळेल या अपेक्षेत शेवाळे कुटुंबीय होते. सोमवारी शेवाळे यांच्या नातवंडांची बरे नसल्याने त्यांना कळवण येथे रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रीमती शेवाळे त्यांच्यासोबत रु ग्णालयातच होत्या. याचवेळी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारांमध्ये अचानक घर्षण झाल्याने ठिणग्या उडाल्या व त्या खाली असलेल्या डाळिंब बागेवर पडल्या. त्यामुळे संपूर्ण बागेने क्षणात पेट घेतला. यावेळी शेतात असलेले भास्कर शेवाळे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, या आगीत हात व पायाला गंभीर जखमा झाल्या असतानाही त्यांनी आरोळ्या मारून परिसरातील इतर शेतकर्यांना बोलाविण्याचा आटापिटा केला. मात्र सोसाट्याचा वारा व आगीच्या रौद्ररूपामुळे ३ एकर क्षेत्रावरील संपूर्ण बाग भस्मसात झाली. या आगीत शेवाळे यांच्या १६०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र (फिल्टर मशीन), फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युत पेटी, वायर या सर्व गोष्टी जळून खाक झाल्या. दरम्यान, आज मंगळवारी रोजी सकाळी तलाठी वाय.जी.पठाण, कृषी सहाय्यक एस.के.पाटील, ग्रामसेवक आर.एच.शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
तालुक्याच्या महसूल, वीज महावितरण व कृषी विभागाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी आण िशेवाळे कुटुंबियांना नुकसानभरपाई देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बागलाण विकास मंचचे समन्वयक नंदिकशोर शेवाळे, दादाजी शेवाळे, दीपक शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, बबन गांगुर्डे, दगा गांगुर्डे, रोशन शेवाळे, सुनील जगताप आदींनी केली आहे.

Web Title: Pomegranate Bagh Khak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक