डाळिंब मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:23 AM2019-08-08T00:23:13+5:302019-08-08T00:23:40+5:30
कोकणगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकºयाच्या ५० गुंठ्यांमधील डाळिंबबागेला बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोकणगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकºयाच्या ५० गुंठ्यांमधील डाळिंबबागेला बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील शेतकºयाने ५० गुंठ्यांमध्ये डाळिंबबाग लावलेली आहे. यावर्षी दुष्काळाचा सामना करून या शेतकºयाने तीन बोअरवेल केल्या होत्या. त्यापैकी एकाही बोअरवेलला पाणी लागले नाही. गायकवाड यांनी दुष्काळात टॅँकरने विकत पाणी घेऊन डाळिंबबाग जगविली. आजच्या भावाप्रमाणे त्या शेतकºयाचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेती संकटात आली आहे असे संजय बाबूराव गायकवाड यांनी सांगितले. कृषी विभाग व संबंधित अधिकारी यांनी डाळिंब, टमाटा, मका सोयाबीन, भुईमूग या पिकांमध्ये कादवा नदीचे पुराचे पाणी गेल्यामुळे नुकसान झाले आहे. पिकांची पाहणी करून पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पाणी विकत घेऊन जगविली होती बागयावर्षी दुष्काळाचा सामना करून या शेतकºयाने तीन बोअरवेल केल्या होत्या. त्यापैकी एकाही बोअरवेलला पाणी लागले नाही. गायकवाड यांनी दुष्काळात टॅँकरने विकत पाणी घेऊन डाळिंबबाग जगविली. तेल्यासारख्या रोगावर मात करीत पिकविली होती, पण अति पाऊस झाल्यामुळे त्या डाळिंब- बागेचे ७००-८०० कॅरेटचे नुकसान झाले आहे.