मानोरी परिसरात पाण्याअभावी डाळिंब बाग धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:50 PM2019-02-21T17:50:52+5:302019-02-21T17:51:14+5:30
मानोरी : बदलत्या वातावरणामुळे शेतकरी दिवसेदिवस चिंतेत सापडला असून कधी कडाक्याचे ऊन, कधी कडाक्याची थंडी तर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असून आता तर कडाक्याच्या उन्हाने सारे हैराण झाले आहेत. त्यामुळे पाण्याअभावी आता डाळींबाच्या बागा वाळू लागल्या आहेत.
मानोरी : बदलत्या वातावरणामुळे शेतकरी दिवसेदिवस चिंतेत सापडला असून कधी कडाक्याचे ऊन, कधी कडाक्याची थंडी तर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असून आता तर कडाक्याच्या उन्हाने सारे हैराण झाले आहेत. त्यामुळे पाण्याअभावी आता डाळींबाच्या बागा वाळू लागल्या आहेत.
येवला तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांबरोबर डाळिंबाची बाग देखील धोक्यात आल्याचे दिसून येत असल्याने पुढच्या काही दिवसात पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंब बाग तोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार असून लाखो रु पयांचा खर्च आणि मेहनतीवर पूर्णता पाणी फिरणार असल्याने डाळिंब उत्पादक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
यंदा पावसाने सर्वत्रच पाठ फिरवल्याने येवला तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यापासून दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत आहे. दिवसेदिवस उन्हाची दाहकता वाढत चालल्याने डाळिंब बागेतील रोपांची हिरवी पाने सुकू लागली आहेत. मानोरी बुद्रुक, खडकीमाळ येथील शेतकºयांचे भवितव्य दुष्काळ परिस्थितीमुळे यंदा पालखेड आवर्तनावर अवलंबून होते.
परंतु पाणी वाटपाचे नियोजन न झाल्याने खडकीमाळ येथील यंदा खडकीमाळ येथील वितरिका क्र मांक २५ ला पाणी न पोहचल्याने पालखेड आवर्तनापासून शेतकरी वंचित राहिल्याने शेतातील विहीर, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून ज्या शेतकºयाजवळ तुरळक पाणी आहे. ते शेतकरी आपल्या पिकांना ड्रीपच्या आधारे थेंब थेंब पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत.
खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात खर्च करण्यापेक्षा डाळिंब बागाचे वर्षातून एकच पिक घेऊन गोंधळात पडण्यापेक्षा दुसºया पिकांचा विचार करु लागले आहेत. जळगाव नेउर, नेउरगाव, एरंडगाव, मानोरी बुद्रुक, देशमाने, पिंपळगाव लेप, भिंगारे, चचोंडी, शिरसगाव लौकी, जऊळके आदि परिसरात शेतकºयांची हजारो एकर द्राक्षे आणि डाळिंब बागाची लागवड यंदा पाण्याअभावी धोक्यात आली असून उष्णता अशीच कायम राहिल्यास डाळिंब बागावर नक्कीच कुºहाड चालवण्याची वेळ शेतकºयावर येणार आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंबाच्या झाडांना खोडकीड तसेच तेल्या सारख्या भयंकर रोगांनी थैमान देखील घातल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला होता. या भयंकर रोगांना आळा घालण्यासाठी महागडी कीटकनाशके, औषधे फवारणी करून डाळिंब बाग मातीमोल होताना दिसत आहे. त्यामुळे डाळिंब फळ धरून विक्र मी उत्पादन घेण्याचा निर्णय अंगाशी आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे दिसून येत आहे.
कोट....
एक महिन्यापासून उष्णता प्रचंड वाढल्याने या उष्णतेचा परिणाम विहिरीतील पाण्यावर होत असून डाळिंब बागाला दिवसेदिवस पाणी कमी पडत असून झाडे सुकू लागली आहेत. झाडांची पाने देखील अपोआप गळून झाड मोकळे होत आहे. अजून पंधरा दिवस बाग दम धरेल एव्हडेच पाणी मिळेल शिल्लक असून उन्हाची तीव्रता अशीच कायम राहिल्यास परिणामी डाळिंब बाग हातातून जाण्याची शक्यता वाटू लागली आहे. त्याकरीता पालखेडमधून आवर्तन सोडणे गरजेचे झाले आहे.
-------- सागर जाधव, शेतकरी.