डाळिंब, द्राक्षबागा भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 08:48 PM2020-08-11T20:48:36+5:302020-08-11T23:59:53+5:30
पाटोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने व व्यापाऱ्यांनीही खरेदीकडे पाठ फिरविल्याने शेतकºयांनी बागेतील तयार माल शेताच्या कडेला तोडून टाकला तर काही माल कवडीमोल दराने विकावा लागल्याने या भागातील शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
गोरख घुसळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने व व्यापाऱ्यांनीही खरेदीकडे पाठ फिरविल्याने शेतकºयांनी बागेतील तयार माल शेताच्या कडेला तोडून टाकला तर काही माल कवडीमोल दराने विकावा लागल्याने या भागातील शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
डाळिंबबागांचीही अवस्था अशीच झाली. त्यातच या बागांवर प्लेग, खरड्या, तेल्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने बागा या रोगाच्या बळी ठरल्या आहे. या भागातील शेतकºयांनी डाळिंब व द्राक्षबागा तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या भागातील अडीच हजार हेक्टर द्राक्ष व साडेसातशे हेक्टर डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीमुळे तयार डाळिंबासाठी बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने तसेच ऐन विक्रीच्या तोंडावर फळांवर तेल्या तसेच झाडावर प्लेग खरड्याा या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तयार डाळिंब दहा रुपये किलो या कवडीमोल दराने विकावे लागल्याने बागेवर केलेला खर्चही वसूल झाला नाही त्यामुळे नाइलाजास्तव पाटोदा येथील शेतकरी सुकदेव मेंगाणे,अनिल मेंगाणे, दिनकर बोरणारे या शेतकºयांनी आपल्या डाळिंबबागांवर कुºहाड चालवीत डाळिंबबागा तोडून टाकत भुईसपाट केल्या, तर ठाणगाव येथील अनिल कव्हात, दीपक कव्हात या भावांनी आपली सुमारे चार एकर द्राक्ष बागेवर कुºहाड चालविली .शेतकºयांना आर्थिक फटकायेवला तालुक्यात हजारो क्विंटल डाळिंब झाडावर सडले; पाटोदा परिसरातील शेतकरी फेब्रुवारी मार्च महिन्यातील बहार धरत असतात. मात्र यावर्षी फळ तयार झाल्यानंतर फळावर तेलकट डाग निर्माण झाल्याने निम्म्यापेक्षा जास्त फळ हे झाडावर सडून खराब झाले. त्यामुळे शेतकºयांनी हे फळ शेताच्या कडेला तोडून फेकून दिले आहे, तर उर्वरित डाळिंब फळाला मागणीअभावी दहा ते पंधरा रुपये किलो या कवडीमोल दराने विक्री करावी लागल्याने शेतकरीवर्गाला आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
पाटोदा परिसरातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष व डाळिंब शेतीकडे वळाले आहे. यातून शेतकºयांना चार पैसे मिळत होते. मात्र यावर्षी द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर जगात कोरोनासारख्या महामारीने वेठीस धरल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पाच वर्षांपूर्वी सुमारे चार लाख रुपये खर्च करून डाळिंबबाग उभी केली. तीन वर्षे चांगला नफा झाला, मात्र यावर्षी मोठा खर्च करूनही कोरोना महामारीमुळे डाळिंब विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. त्यातच ऐन विक्रीच्या वेळेस फळावर तेलकट डाग पडल्याने दहा ते बारा रुपये किलो आशा कावडीमोल दराने विक्री करावी लागली. केलेला खर्चर्ही वसूल झाला नाही. त्यातच बागेवर प्लेग, खरड्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अडीच एकर डाळिंबबाग तोडून टाकली .
- सुकदेव मेंगाणे, पाटोदाशेतकºयांनी उत्पादित केलेल्या कोणत्याच मालाला दर मिळत नाही. लॉकडाऊनपासून तर शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. आठ ते दहा रुपये दराने द्राक्ष विक्री करावी लागली. त्यामुळे आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. उत्पन्न व उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाही. केलेला संपूर्ण खर्च वाया गेला. त्यामुळे वैतागून सुमारे चार एकर द्राक्षबाग तोडून टाकली.
-अनिल कव्हात, शेतकरी, ठाणगाव.