पिळकोस शिवारात रानडुक्करांचा धुमाकूळ; पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2015 10:42 PM2015-09-11T22:42:57+5:302015-09-11T22:43:25+5:30

पिळकोस शिवारात रानडुक्करांचा धुमाकूळ; पिकांची नासाडी

The pomp of Shiva in Pilikas Shivar; Spoilage of crops | पिळकोस शिवारात रानडुक्करांचा धुमाकूळ; पिकांची नासाडी

पिळकोस शिवारात रानडुक्करांचा धुमाकूळ; पिकांची नासाडी

googlenewsNext


पिळकोस : भादवण, विसापूर, पिळकोस शिवारात रानडुक्करांनी धुमाकूळ घातला असून, शेतातील उभ्या मका पिकाची नासाडी झाल्याने बळीराजा चिंतित झाला आहे. वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सचिन सदाशिव जाधव यांच्या शेतातील चार एकर मका क्षेत्राचे रानडुक्करांनी रात्रीतून नुकसान केले. आर. पी. ढोमसे, वनक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील, डी. जे. भोये, विजय पवार, वनमजूर या कर्मचाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून पंचनामा केला. तलाठी एम. के. गांगुर्डे, कोतवाल, पंकज बच्छाव यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. रानडुक्करांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी नीलेश जाधव , कैलास जाधव, पंकज जाधव, गौतम जाधव, मोहन जाधव, प्रवीण जाधव, सोपान जाधव यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The pomp of Shiva in Pilikas Shivar; Spoilage of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.