गोदावरी नदीला पानवेलींचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:46 PM2018-03-21T12:46:51+5:302018-03-21T12:46:51+5:30
सायखेडा : ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आसतांनाच गोदावरी नदीच्या पात्रात पानवेल पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण आहे गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असुन, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे.
सायखेडा : ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आसतांनाच गोदावरी नदीच्या पात्रात पानवेल पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण आहे गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असुन, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे. गोदाकाठ भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा सायखेडा परिसरातून होत आहे कुपनलिकेच्या अनेक विहिरी आण िपाईपलाईन या परिसरातून असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, खराब पाण्यामुळे साथीचे रोग पसरून विविध रोगांना आमंत्रित केले जात आहे. नांदुरमधमेश्वर बंधार्यामुळे पश्चिमेला सायखेडा, चाटोरीपर्यंत थोप असल्याने, याभागात पाण्याला संथ प्रवाह असतो. त्यामुळे पाण्याबरोबर वहात आलेल्या पाणवेली अनेक ठिकाणी अडकुन आहे. त्यामुळे पाणी दुषित होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी हिरवेगार, परिसरात डास, अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने, ग्रामस्थांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे साथींच्या आजरांना आमंत्रण दिले जात आहे. नदीपात्रातील पाण्याला पाणी बेरंग अला असुन, बहुतेक गावांत नदीपात्रातून थेट उपसा करून पाणीपुरवठा केला जात असल्याने, हिरवा रंग, दर्पवास, जंतु सदृश्य दूषित पाणी पुरवठा होतो. तर उन्हाची तिव्रता वाढल्याने ग्रामस्थ पाणी विकत घेऊन, आपली तहान भागवत आहे, यात ग्रामस्थांचे हाल होत असून, ग्रामस्थांबरोबरच जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणवेली काढून टाकाव्यात अशी मागणी होत आहे.