घरोघरी नाग-नरसोबाचे पूजन
By Admin | Published: August 8, 2016 01:13 AM2016-08-08T01:13:18+5:302016-08-08T01:14:16+5:30
घरोघरी नाग-नरसोबाचे पूजन
नाशिक : श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण शहरात रविवारी (दि. ७) सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या सणाला घरोघरी देव्हाऱ्याजवळ नाग-नरसोबाचे चित्र चिटकवून तसेच देवाजवळ नागदेवतेची रांगोळी काढून नामपंचमीची विधीवत पूजा करण्यात आली.
नागदेवतेची मनोभावे पूजा करताना भिंतींवर तसेच पाटावर नागाची चित्र काढण्यात आली होती. नागपंचमीला अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, तक्षक, कालिया, शंखपाल, पद्मक, कर्काेटक या नऊ नागांच्या पुजनाला विशेष महत्त्व असल्याने पूजा करताना भाविकांकडून प्रार्थनेतून या नवनागांचा उल्लेख करण्यात आला. यावेळी लाह्या, दूध, खीर आणि उकडीच्या पाणोळ्यांचा नैवेद्य दाखविण्यात येऊन कहाणीचे वाचन करण्यात आले.
घरोघरी नागपंचमीनिमित्त गव्हाची खीर, पुरणाचे दिंडं, उकडीचे पाणोळे अशा पदार्थांचे सेवन करण्यात आले.