महादेवाच्या दरीतील पुजा-याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 07:06 PM2018-08-05T19:06:21+5:302018-08-05T19:06:42+5:30

शहराच्या दाक्षिणेस असलेल्या महादेवाच्या दरीतील श्रीक्षेत्र महादेव मंदिरात पूजापाठ करणाऱ्या बाबांचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी एका संशयितास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pooja's blood in the valley of Mahadeo | महादेवाच्या दरीतील पुजा-याचा खून

महादेवाच्या दरीतील पुजा-याचा खून

Next

पेठ : शहराच्या दाक्षिणेस असलेल्या महादेवाच्या दरीतील श्रीक्षेत्र महादेव मंदिरात पूजापाठ करणाऱ्या बाबांचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी एका संशयितास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पेठ शहराच्या पाठीमागील बाजूस महादेवाच्या दरीत महादेवाचे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी गत १५ वर्षांपासून मौनी जंगलीदास महाराज यांचे एका कुटीत वास्तव्य आहे. त्यांच्या समवेत असलेले शिष्य मोतीराम मल्हारी राऊत (राऊतबाबा) हे नियमित मंदिरात पूजापाठ व देखरेखीचे काम करत असत. जंगलीदास महाराज स्वत:च्या औषधोपचारासाठी पेठ येथे आले असल्याने राऊत बाबा एकटेच असल्याची संधी साधून प्रभाकर किसन शार्दूल, रा. देवगाव याने कुटीत शिरण्याचा प्रयत्न केला. शार्दुल त्यास गांजाचे व्यसन असल्याने राऊतबाबांनी त्यास प्रतिकार करत कुटीतून बाहेर काढले. पैशाची मागणी करून जवळच असलेल्या टणक वस्तूने संशयिताने बाबांच्या डोक्यावर, चेहºयावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबांचा जागीच मृत्यू झाल्याने संशयित शार्दुल याने मृतदेह दरीत फेकून दिला. दोन दिवसांपूर्वीच संशयित कुटीत येऊन पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन गेला होता असे सांगण्यात आले. मंदिरात आलेल्या भक्तांना राऊतबाबा आढळून आले नसल्याने परिसरात शोध घेतला असता दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबत जंगलीदास महाराज यांनी पेठ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी एस.पी. गोरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोलीस उपनिरीक्षक आर.एम.भरसट आदींनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. संशयित प्रभाकर शार्दुल यास ताब्यात घेण्यात आले असून, पेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अतिशय निर्जन ठिकाणी असलेल्या या देवस्थानातील शिष्याचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Pooja's blood in the valley of Mahadeo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.