गोदावरी पात्राला पाणवेलींचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:19 AM2018-03-26T00:19:22+5:302018-03-26T00:20:52+5:30
एकलहरे गंगावाडी येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली साचल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. गोदावरी नदीपात्र स्वच्छ करून परिसरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
एकलहरे : एकलहरे गंगावाडी येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली साचल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. गोदावरी नदीपात्र स्वच्छ करून परिसरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. एकलहरे गंगावाडी गोदावरी नदीपात्रातील पाण्याने तळ गाठला असून, त्यावर मोठ्या प्रमाणात पाणवेली पसरल्या आहेत. यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसभर कडक उन्हामध्ये शेतात व कारखान्यात काम करणाऱ्या नागरिकांना रात्री घरी आल्यावर डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नदीपात्रातील पाणवेलींमध्ये दडून बसणारे डास सायंकाळनंतर बाहेर पडत असल्याने घर अथवा शेतात झोपणाºया सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गोदावरी नदीपात्रात पाण्याचे डबके साचल्याने त्या ठिकाणी डास उत्पत्तीचे मोठे केंद्र बनले आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. तसेच एकलहरा ग्रामपंचायतीने डासांचा उपद्रव रोखण्यासाठी नदीपात्र, एकलहरे वसाहत व मळे परिसरात नियोजन करून धूर फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.