फुले दाम्पत्याचे विचार, कार्य क्र ांतिकारी : पी. एम. सैनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:57 AM2019-03-12T00:57:59+5:302019-03-12T00:58:57+5:30
फुले दाम्पत्याने क्र ांतिकारी विचारांनी केलेल्या कार्यामधून समाजाच्या प्रवाहाची दिशा बदलली, असे प्रतिपादन आॅल इंडिया सैनी सेवा समाज संस्थेचे सरचिटणीस पी. एम. सैनी यांनी केले
नाशिक : फुले दाम्पत्याने क्र ांतिकारी विचारांनी केलेल्या कार्यामधून समाजाच्या प्रवाहाची दिशा बदलली, असे प्रतिपादन आॅल इंडिया सैनी सेवा समाज संस्थेचे सरचिटणीस पी. एम. सैनी यांनी केले. माळी समाजसेवा समितीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि.१०) काट्या मारुती चौक जुना आडगाव नाका येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पी. एम. सैनी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी ते बोलत होते.
माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, महात्मा जोतिबा फुले यांनी तत्कालीन समाजातील शैक्षणिक परिस्थितीचे वर्णन आपल्या शब्दांत केले. शिक्षणाने स्त्री दास्यत्वाला झुगारून देईल. धर्म समजून घेईल. पुरु षांच्या बरोबरीने येईल, या भीतीपोटी स्त्री ही शिक्षण घेण्यास असमर्थ आहे. त्यांनी जर शिक्षण घेतले तर धर्म भ्रष्ट होईल याविषयी ज्ञानसंपन्न व्यक्तींचे दाखले देण्यास हा समाज विसरत नाही. स्त्रिया परिवर्तन करू शकतात, असेही ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे, राजस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष कैलास सैनी, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पवार, उत्तमराव बडदे, प्रभाकर क्षीरसागर, प्रवीण जेजुरकर, हरिश्चंद्र विधाते, किशोर भास्कर, महेश गायकवाड, दत्ता ढोले, गणेश हिरवे, बबलू भडके, सचिन दप्तरे, नंदकुमार येवलेकर, देवीदास खैरे, संतोष मौर्य, लंलन मौर्य, बाळासाहेब वाघ, विलास वाघ, मंगला माळी, चारु शिला माळी, राजकुमार जेफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभाकर क्षीरसागर यांनी केले.
सावित्रीबाईंना प्रथम शिकवून महात्मा फुले यांनी त्यांना अपेक्षित असणारे परिवर्तन घडवून आणले. महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचारांचे महत्त्व सावित्रीबाईंना पटले होते. जीवनाला विकसित करायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, सुधारणेचे मूळ हे शिक्षणच आहे, असे विचार समाजासमोर मांडले असल्याचे मत व्यक्त केले.