कोळगाव ते खेडले झुंगे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:24+5:302021-08-24T04:18:24+5:30
कोळगाव भागातील खेडले झुंगे परिसराला छोटे-मोठे व्यवसाय विकसित होत असल्याने स्थानिक गावांसाठी एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. परंतु, ...
कोळगाव भागातील खेडले झुंगे परिसराला छोटे-मोठे व्यवसाय विकसित होत असल्याने स्थानिक गावांसाठी एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. परंतु, या परिसरातील रस्ते चिखलमय झाल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधींचे रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून, या भागातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोळगाववरून खेडले गावात जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे मोठ्या वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करीत जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना चिखल तुडवत दीड ते दोन किलोमीटर जावे लागत आहे. कोळगाव ते खेडला या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोन्ही गावांतील नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.
कोट....
कोळगाव खेडला या रस्त्याचे गेल्या पंधरा वर्षांपासून काम झालेले नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी नागरिकांना फक्त आश्वासने देतात. विकासकामांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे .पुढाऱ्यांनी फक्त मतांवर डोळा न ठेवता लोकांच्या अडचणीही सोडवाव्यात.
विशाल घोटेकर
व्यावसायिक, कोळगाव, खेडले झुंगे
फोटो- २३ काेळगाव रोड
कोळगाव ते खेडले झुंगे रस्त्याची झालेली दुरवस्था.