सोयगावात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 08:46 PM2021-11-28T20:46:27+5:302021-11-28T20:46:56+5:30

सोयगाव : येथील पंचशीलनगर, विश्वकर्मा चौक येथील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयाला दरवाजेच नाहीत, शिवाय नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार आहे.

Poor condition of public toilets in Soyagaon | सोयगावात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

सोयगावात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देशौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सोयगाव : येथील पंचशीलनगर, विश्वकर्मा चौक येथील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयाला दरवाजेच नाहीत, शिवाय नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार आहे.

शौचालयाजवळ पाणी व्यवस्था नाही. सेफ्टी टँकला झाकणच नाही. मागील काही महिन्यांपासून महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील महिला महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहेत. नगरसेवक लक्ष देत नसल्याची तक्रार आहे.
सोयगावात दोन सार्वजनिक शौचालये असून, त्यापैकी एक मागील काही वर्षांपूर्वी पाण्याच्या टाकीजवळ तयार करण्यात आला आहे, तर दुसरे शौचालय हे पंचशीलनगर, विश्वकर्मा येथे आहे. त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. पंचशीलनगर विश्वकर्मा चौक, मळी, सुदामनगर, गावठाण (मारुती मंदिर परिसरातील) लोकांच्या वापराचा हा शौचालय होता. मात्र त्याची सध्या खूपच दुरवस्था झाली आहे. संडासला दरवाजे नाहीत, सेफ्टी टँकचे झाकण तुटले आहे. पाण्याची व्यवस्था नसून नियमित साफसफाईसुद्धा होत नाही. शोषखड्डे उघडे असून, मैला गटारीत जातो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रोगराईचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातदारू बाटल्या, गुटखा पुड्या पडलेल्या आहेत.

शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने गावातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी होत असताना महानगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. सोयगाव शौचालयांच्या दुरवस्थेमुळे महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने शौचालयाच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने सुरू करावे. शौचालयांचे तुटलेले दरवाजे बसवून या ठिकाणी संरक्षक भिंतदेखील बांधून महिलांची होत असलेली गैरसोय टाळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोट... हद्दवाढमुळे गाव हे दहा ते बारा वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झाले आहे. सोयगाव गावठाणमध्ये जुन्या पध्दतीने गल्ली प्रकारात बांधलेली घरे असून, घरगुती शौचालय बनवण्यासाठी पुरेशी जागा नाही. शिवाय शोषखड्डे, सेफ्टी टँक बनविण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने सार्वजनिक शौचालय हाच एकमेव पर्याय आहे. शिवाय वाढती लोकसंख्या पाहता अद्ययावत सार्वजनिक शौचालय असणे गरजेचे झाले आहे.
- पंकज बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते
 

Web Title: Poor condition of public toilets in Soyagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.