नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:46 PM2020-08-21T12:46:00+5:302020-08-21T12:46:27+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. गेल्या काही दिवसापासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. गेल्या काही दिवसापासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्री अपरात्री येणाऱ्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. परिसरातील शिवार रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्याने रस्त्यावरील चिखलातून वाट काढताना शेतकºयांचे हाल होत आहेत. नांदूरशिंगोटे गावात येणाºया काही रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. परंतु त्यापुढील रस्त्यांचे मजबुतीकरण झालेले नसल्याने शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच येथील शिवार रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे. शेतकºयांनी शेतात पिकविलेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने अद्यापही शेती शिवारात पाणी साचलेले असल्याने वावर उखळून गेले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी वाड्या वस्त्यांवर राहत असल्याने गाव दळणवळण साठी शिवार रस्त्याचाच वापर करावा लागतो. शिवार रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने दुचाकीवरुन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.