उद्यानांमधील खेळण्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:34 AM2021-01-13T04:34:57+5:302021-01-13T04:34:57+5:30
ग्रीन जीमभोवती गवत नाशिक : महापालिकेने शहरातील काही उद्यानांमध्ये बसविलेल्या ग्रीन जीमच्या भोवती मोठ्या प्रमाणात काॅंग्रेस गवत उगवले आहे. ...
ग्रीन जीमभोवती गवत
नाशिक : महापालिकेने शहरातील काही उद्यानांमध्ये बसविलेल्या ग्रीन जीमच्या भोवती मोठ्या प्रमाणात काॅंग्रेस गवत उगवले आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या परिसरात गवत काढून स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल
नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. नेते मंडळी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजीपाला पिकांवर परिणाम
नाशिक : ढगाळ वातावरण आणि मागील दोन-तीन दिवसांपासून पडणारा पाऊस यामुळे भाजीपाला पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पिके जगविण्यासाठी शेतकरी वेगवेगळी कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
शहरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न
नाशिक : शहरालगतच्या ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून प्रचारफेऱ्या काढल्या जात आहेत. शहरात राहाणाऱ्या मतदारांशी फोनव्दारे किंवा प्रत्यक्ष संपर्क करून मतदानाला येण्याबरोबरच आपल्याल विजयी करण्याचे आवाहनही केले जात आहे. यामुळे शहरी भागातही निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे.
पुलांवर होणाऱ्या पार्किंगमुळे अडथळा
नाशिक : शहरातील गाडगेमहाराज पूल व अहिल्यादेवी होळकर पुलावर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांचे पार्किंग होऊ लागले आहे. वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
संरक्षक जाळ्यांची दुरवस्था
नाशिक : गोदाघाटावर काझी गढी परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी जाळ्या तुटल्या आहेत. यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने संरक्षक जाळ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.