घरच्या घरी करा ‘पीओपी’ गणेशमूर्तीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:29 AM2017-08-28T00:29:38+5:302017-08-28T00:29:44+5:30

पालवी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृतीपर चळवळ राबविली जात आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी गंगापूररोडवरील प्रियंका ब्लॉमस, सिरीन मिडोज याठिकाणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

'POP', Ganesh idol immersion at home | घरच्या घरी करा ‘पीओपी’ गणेशमूर्तीचे विसर्जन

घरच्या घरी करा ‘पीओपी’ गणेशमूर्तीचे विसर्जन

Next

नाशिक : पालवी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृतीपर चळवळ राबविली जात आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी गंगापूररोडवरील प्रियंका ब्लॉमस, सिरीन मिडोज याठिकाणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालवी फाउंडेशनच्या सदस्यांनी अमोनियम बायो कॉर्बोनेटच्या माध्यमातून घरच्या घरी पीओपीच्या गणेशमूर्तीचे कशाप्रकारे विसर्जन करावे, याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवले. एका बादलीमध्ये मूर्तीच्या उंचीनुसार मूर्ती बुडेल इतके पाणी व मूर्तीच्या वजनाइतके अमोनियम बायो कार्बोनेट घ्यावे. लांब काठीने सदर मिश्रण ढवळून घ्यावे. सदर प्रक्रिया सुरू असताना वरच्या भागावर पाण्याचे बुडबुडे तयार होऊन अमोनियम गॅसचा गंध पसरतो. गणेशमूर्तीवरील निर्माल्य व सजावटीच्या वस्तू काढून घेऊन मूर्ती सदर मिश्रणात विसर्जित करावी. सुरुवातीला काही तास पाण्यावर मूर्ती तरंगत राहील व हळूहळू पाण्याच्या तळाशी जाईल. बादलीवर झाकण ठेवून ती बाजूला ठेवावी व बादलीतील मिश्रण दिवसातून ६ ते ७ वेळा काठीने ढवळावे. साधारणत: ६ ते ७ दिवसांनंतर पीओपीची मूर्ती पूर्ण विरघळून जाते व त्याचे दोन थर तयार होतात. वरचा थर हा अमोनियम सल्फेट असतो. ते उत्तम प्रकारचे खत असते. सदर खताचा वापर घरातील झाडांसाठी वापरता येऊ शकतो, अशी माहिती यावेळी सदस्यांनी दिली. दरम्यान, अमोनियम बायो कार्बोनेट हे मनपाच्या सहाही विभागात उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: 'POP', Ganesh idol immersion at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.