भाजपाच्या लोकप्रियतेने शिवसेनेला पोटशूळ

By Admin | Published: February 18, 2017 12:16 AM2017-02-18T00:16:37+5:302017-02-18T00:16:58+5:30

रावसाहेब दानवे : मखमलाबाद येथील सभेत टीका

The popularity of the BJP, Shiv Sena's potashul | भाजपाच्या लोकप्रियतेने शिवसेनेला पोटशूळ

भाजपाच्या लोकप्रियतेने शिवसेनेला पोटशूळ

googlenewsNext

नाशिक : लोकसभा, विधानसभा अन् त्यापाठोपाठ झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले़ पक्षाची जनमानसात वाढत चाललेली लोकप्रियता व विश्वास पाहून प्रदीर्घ काळापासूनचा मित्रपक्ष शिवसेनेच्या पोटात शूळ उठला आहे़ त्यामुळेच महापालिका निवडणुकीत त्यांनी युती तोडली असे सांगून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली़ येत्या २३ तारखेला भाजपाच राज्यातील नंबर एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असे भाकितही वर्तविले़  भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मखमलाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत दानवे बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील १० महापालिकांसह २५ जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर दौरे सुरू असून, यामध्ये भारतीय जनता पक्षावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून आले आहे़ गत लोकसभा, विधानसभा व त्यापाठोपाठ झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला़ यापूर्वी भाजपाचे केवळ २४० नगरसेवक व ८ नगराध्यक्ष होते, मात्र ही संख्या आता ८० नगराध्यक्ष व १२०७ नगरसेवक इतकी झाली आहे़ राज्यातील सर्व पक्ष हे भाजपाविरोधात एकवटले असून, एकमेकांच्या फलकांवर झळकत आहेत. आपणच तारणहार असल्याचे सांगत आहेत़ मात्र, पूर्वीची आणेवारीची, नुकसानभरपाईची पद्धत, पीकविमा पद्धती बदलण्यासाठी भाजपानेच तत्कालीन सरकारशी संघर्ष केला़ सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या व सोन्याच्या ताटात जेवण करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे हाल कसे समजणार, असा सवाल करून भाजपा सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने सोशल मीडियावर भाजपाची बदनामी सुरू केली आहे़  केंद्रात तसेच राज्याच्या तिजोरीवर कमळाचे कुलूप असून, ते उघडण्यासाठी कमळाचीच चावीची आवश्यकता आहे. मतदार सुज्ञ असल्याचे दानवे यांनी सांगितले़ यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, रोहिणी नायडू आदिंसह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The popularity of the BJP, Shiv Sena's potashul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.