वर्क फ्रॉम होमसाठी योग्य मांडणीतून सकारात्मक ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:39+5:302021-02-07T04:14:39+5:30
नाशिक : ‘वर्क फ्रॉम होम’ करताना कामाची ठिकाणी नैसर्गिक प्रकाश, हवा व आवश्यक त्या टेबल, खुर्चीसारख्या साहित्याची रचना योग्य ...
नाशिक : ‘वर्क फ्रॉम होम’ करताना कामाची ठिकाणी नैसर्गिक प्रकाश, हवा व आवश्यक त्या टेबल, खुर्चीसारख्या साहित्याची रचना योग्य पद्धतीने केली, तर घरातून काम करतानाही सकारात्मक ऊर्जेची अनुभती मिळू शकते. त्याचप्रमाणे, घरातून काम करतानाही आपल्याला सोइस्कर असा पेहराव करून काम केले, तर कार्यालयाप्रमाणेच घरूनही काम करणे सहज सोपे होईल, असा सल्ला इंग्लड येथील इंटेरिअर डिझायनर इक्बाल पटेल यांनी दिला आहे.
एसएमआरके महिला महाविद्यालयात ‘हॉ-फीस: दि न्यू नॉरमल’ विषयावर शनिवारी (दि.६) व्हर्च्युअल आंतरराष्ट्रीय वेबिनारचा समारोप झाला. या वेबिनारमध्ये विविध विषयांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. वेबिनारच्या प्रथम सत्रात सत्रात वर्क फ्रॉम होमविषयी बोलताना इक्बाल पटेल यांनी हो-फीस म्हणजेच न्यू-नॉर्मलमध्ये घरातून काम करण्याची संकल्पना मांडली. या विषयी सभासदांनी उपस्थित केलेल्या शंकाचे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आर्किटेक्ट मृणालिनी लोणी यांनी समन्वय साधला. या परिसंवादासाठी भारतातील २१ राज्यांतून व जगभरातील ७ देश- अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, अफगाणिस्तान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जर्मनी येथून तब्बल ५६० सभासदांनी सहभाग नोंदविला आहे. दुसऱ्या सत्रात फॅशन डिझाइनर हर्ष गुप्ता यांनी घरातून ऑफिस या संकल्पनेमध्ये कपड्यांचे महत्त्व समजावून सांगितले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.मो.स.गोसावी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या वेबिनारचे या प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीप्ती देशपांडे यांनी केले. तृप्ती ढोका यांनी आभार प्रदर्शन केले.