दिंडोरीत मांजाबंदीला सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:35 PM2021-01-13T18:35:30+5:302021-01-13T18:36:21+5:30
दिंडोरी : दिंडोरीत मांजाबंदीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शहरात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली.
दिंडोरी : दिंडोरीत मांजाबंदीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शहरात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्र शासन तसेच राष्ट्रीय हरित लवाद यांचेकडील आदेशानुसार पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन किंवा कृत्रिम पदार्थाचा मुलामा दिलेल्या धाग्यामुळे मानवी आरोग्य व वन्यजीव यांना धोका होत असल्याने अशा धाग्यांचे निर्मिती विक्री साठा खरेदी आणि वापर यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
सदर बंदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिंडोरी नगरपंचायत मार्फत शहरात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच बुधवारी (दि.१३) मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता धिरज भामरे प्रशासकीय सेवेचे प्रदीप मावळकर चेतन गांगुर्डे आणि नगर पंचायत कर्मचारी हर्षल बोरस्ते, अमोल मवाळ, ईश्वर दंडगव्हाळ, सागर भदाणे यांच्या पथकाने शहरात पतंग विक्री दुकानात भेट देऊन धाग्यांची तपासणी केली. पथकाने शहरातील ४ मुख्य तसेच इतर किरकोळ दुकानांत पाहणी केली. या पाहणीत नायलॉन अथवा कृत्रिम धागे आढळून आले नाही. नायलॉन मांजा न विकण्याबाबत दुकानदारही सहकार्य करीत असून दिंडोरी शहरातून नायलॉन मांजा हद्दपार झाल्याचे सांगण्यात आले.