जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा २ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 01:48 AM2021-10-07T01:48:29+5:302021-10-07T01:49:13+5:30
जिल्ह्यात नवीन बाधित आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पुन्हा दोन आकड्यात आली असली तरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा दर पुन्हा २ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ८६४२ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात नवीन बाधित आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पुन्हा दोन आकड्यात आली असली तरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा दर पुन्हा २ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ८६४२ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी (दि. ६) एकूण ९६ रुग्णांची वाढ झाली असून, ९२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन बाधितांमध्ये नाशिक ग्रामीणचे ६० तर शहराच्या ३५ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या ९०४ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ६२३, नाशिक शहराचे २६०, मालेगाव मनपाचे १६ तर जिल्हाबाह्य ४ एवढ्या रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात कोरोनामुक्तचा दर सरासरी ९७.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात नाशिक मनपा ९८.१६ टक्के, जिल्हा बाह्य ९७.८२ टक्के, मालेगाव मनपा ९७.०९ तर नाशिक ग्रामीणचा कोरोनामुक्ती दर ९६.९१ टक्के आहे.
इन्फो
प्रलंबित पुन्हा अडीच हजार पार
प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा अडीच हजार पार जाऊन तब्बल २७०४ वर गेली आहे. त्यातही नाशिक ग्रामीणच्या अहवालांची संख्या तब्बल २३२६ इतकी आहे. तर नाशिक मनपा १७१ आणि मालेगाव मनपातील प्रलंबित अहवाल संख्या २०७ वर आली आहे. नाशिक ग्रामीणच्या प्रलंबित अहवालांची संख्या दोन हजारांवर गेल्याने येत्या दोन दिवसात ग्रामीणच्या बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.