मांस वाहून नेणारे कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Published: June 6, 2017 03:15 AM2017-06-06T03:15:06+5:302017-06-06T03:15:15+5:30

निफाड : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयित मांस वाहतूक करणारे तीन कंटेनर पाठलाग करून पकडून दिल्यानंतर हे कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतले

In possession of container police carrying meat | मांस वाहून नेणारे कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

मांस वाहून नेणारे कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयित मांस वाहतूक करणारे तीन कंटेनर पाठलाग करून पकडून दिल्यानंतर हे कंटेनर निफाड पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर कंटेनरमधून कायदेशीर कागदपत्रांची वाहतूक केली जात असल्याचे तपासाअंती पोलिसांनी सांगितले. मात्र उपस्थित बजरंग कार्यकर्ते यांच्यासह निफाड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी याप्रश्नी सखोल चौकशी करावी, अशी मागणी लावून धरल्यानंतर रात्री उशिरापर्यंत याप्रश्नी खल सुरू होता.
नैताळे येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते समाधान कापसे, स्वरूपानंद बोरगुडे, बापू गुंजाळ, प्रशांत कुंदे, शिरीष कोटकर, ज्ञानेश्वर सोनवणे यांना विंचूर येथील त्रिफुलीवर पाच कंटेनर निफाडकडे येताना दिसले. त्यांना या कंटेनरमध्ये जनावरांचे मांस असल्याचा संशय आला. या कार्यकर्त्यांनी या कंटेनरचा पाठलाग सुरू केला. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे यांना मोबाइलवरून सदर घटनेची माहिती कळविली. अनिल कुंदे हे निफाड येथील शांतीनगर त्रिफुली येथे कार्यकर्त्यांसह हजर झाले. या त्रिफुलीवर बजरंग कार्यकर्ते यांच्यासह आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी यातील तीन कंटेनर अडवले. मात्र दोन कंटेनचालक कंटेनर घेऊन फरार होण्यास यशस्वी झाले. यानंतर निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कंटेनर निफाड पोलीस ठाण्यात आणले. चालकांची चौकशी सुरू केली. याप्रसंगी निफाड पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

Web Title: In possession of container police carrying meat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.