पिस्तूल दाखवून दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:29 AM2019-03-09T01:29:30+5:302019-03-09T01:30:19+5:30
वडाळागावातील घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी इमारतींच्या परिसरात एका तरुणाने हातात एअरगन घेऊन परिसरात फिरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याविषयी इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.
इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी इमारतींच्या परिसरात एका तरुणाने हातात एअरगन घेऊन परिसरात फिरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याविषयी इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.
परिसरात एअरगन घेऊन गोंधळ घालणाऱ्या युवकाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यास ताब्यात घेतले. पोलीस त्याला घेऊन पोलीस ठाण्याकडे निघाले असता संशयिताच्या नातेवाइकांनी पोलिसांना अडवत घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बीट मार्शल मनोज परदेशी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मदत मागविली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सागर पाटील, सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.