पोलीसपुत्राला टोर्इंग कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:50 AM2018-07-29T00:50:42+5:302018-07-29T00:51:17+5:30

टोर्इंग करीत असताना दुचाकीच्या झालेल्या नुकसानीबाबत जाब विचारणाºया पोलीसपुत्राला टोर्इंग व्हॅनवरील कंत्राटी कर्मचाºयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

 Possession of the police son to the employee | पोलीसपुत्राला टोर्इंग कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ

पोलीसपुत्राला टोर्इंग कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ

Next

नाशिक : टोर्इंग करीत असताना दुचाकीच्या झालेल्या नुकसानीबाबत जाब विचारणाºया पोलीसपुत्राला टोर्इंग व्हॅनवरील कंत्राटी कर्मचाºयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मखमलाबादमधील शुभम रमेश मोहिते याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन कर्मचाºयांविरोधात दुचाकीचे नुकसान व शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे़  सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळ शहर वाहतूक शाखेने शनिवारी (दि़२८) वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यावेळी दुचाकीधारकांची हेल्मेट व कागदपत्रांची तपासणी केली जात होती़ यावेळी शुभम मोहिते याच्याकडे हेल्मेट नसल्याने पोलिसांनी दंड केला़ मात्र, दंडाची रक्कम न भरल्याने वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी टोर्इंग करून शरणपूर रोडवरील वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केली़ यानंतर शुभमने दंड भरून दुचाकी सोडवली असता दुचाकीचे नुकसान झाल्याचे समोर आले़ त्याने या नुकसानीबाबत टोइंग कर्मचाºयास सांगितले असता टोर्इंगवरील कर्मचारी दादा हिरवे आणि साजिद शेख या दोघांनी शुभमला शिवीगाळ करीत तुला काय करायचे ते कर, असा दम देत पोलिसांनाही जुमानले नाही़ या दोघांनी अरेरावी करीत नुकसानभरपाई देण्यास नकार दिला़
या प्रकरणी शुभम याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात दुचाकीचे नुकसान करण्यासोबत शिवीगाळ केल्याची फिर्याद दिली आहे़

Web Title:  Possession of the police son to the employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.