दरोडेखोरांना पल्सर पुरविणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:51 AM2019-11-18T01:51:17+5:302019-11-18T01:52:19+5:30

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोड्याप्रकरणी मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात नाशिकमध्ये येऊन रेकी करणारा आणि दरोडेखोरांना नव्या कोऱ्या पल्सर दुचाकी विकत घेऊन पुरविणारा संशयित विश्वजित कुमारसिंग रामप्रल्हादसिंग (३५, रा. मुजफ्फरपूर) यास बिहारच्या कारागृहातून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून या दरोड्याशी संबंधित महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती येणार आहे.

Possession of possession of pulsar to robbers | दरोडेखोरांना पल्सर पुरविणारा ताब्यात

दरोडेखोरांना पल्सर पुरविणारा ताब्यात

Next
ठळक मुद्देमुथूट प्रकरण : बिहारच्या तुरुंगातून पोलिसांनी मिळविला ताबा

नाशिक : उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोड्याप्रकरणी मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात नाशिकमध्ये येऊन रेकी करणारा आणि दरोडेखोरांना नव्या कोऱ्या पल्सर दुचाकी विकत घेऊन पुरविणारा संशयित विश्वजित कुमारसिंग रामप्रल्हादसिंग (३५, रा. मुजफ्फरपूर) यास बिहारच्या कारागृहातून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून या दरोड्याशी संबंधित महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती येणार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २०१८ साली आॅक्टोबरमध्ये विश्वजित हा नाशिक-त्र्यंबकेश्वर दौºयावर आला होता. त्याने त्र्यंबकेश्वरच्या एका आश्रमात वास्तव्य केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. विश्वजितने मुथूटच्या कार्यालयासह संपूर्ण शहरातील रस्त्यांची बारकाईने रेकी केली. तसेच दरोडेखोरांच्या टोळीला गुन्ह्यासाठी पल्सर दुचाकी पुरविल्या. या गुन्ह्याचा कट शिजल्यापासून तो तडीस नेण्यापर्यंत विश्वजितचा मोठा सहभाग होता, असे पोलिसांनी सांगितले.
उल्हासनगरमधून दुचाकीची खरेदी
विश्वजितने उल्हासनगरमधून पल्सर दुचाकी (एमएच ४८, एएस ७०९७) क्रमांकाची दुचाकी खरेदी करून दरोडेखोरांना दिली. या दुचाकीचा वापर दरोड्यात झाला होता. त्यानुसार नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बिहार कारागृहासोबत संपर्कसाधून न्यायालयाचे प्रोडक्शन वारंट मिळवून विश्वजितचा ताबा घेतला. त्यास अटक करण्यात आली असून, पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त समीर शेख, अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांचे पथक तपास करीत आहेत.

Web Title: Possession of possession of pulsar to robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.