घोटी-सिन्नर मार्गावर लूट करणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:44 PM2018-09-24T16:44:33+5:302018-09-24T16:44:50+5:30

कारसह मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

In the possession of the robbery on the Ghoti-Sinnar road | घोटी-सिन्नर मार्गावर लूट करणारे ताब्यात

घोटी-सिन्नर मार्गावर लूट करणारे ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देविना नंबरची स्विफ्ट डिझायर कार गाडीस आडवी लावून तोंडावर मिरचीचा स्प्रे मारत लूट केली होती

नाशिक : घोटी-सिन्नर मार्गावर दि. १६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ठाणे येथील रहिवासी संजीत शेवाळे हे त्यांचे पत्नीसह स्कोडा कारने ठाणे येथे जात असतांना अज्ञात गुन्हेगारांनी त्यांच्याजवळील विना नंबरची स्विफ्ट डिझायर कार गाडीस आडवी लावून तोंडावर मिरचीचा स्प्रे मारत लूट केली होती. या गुन्ह्याचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कारसह २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हेगारांनी संजीत शेवाळे यांच्या गाडीतील पाठीमागील सीटवर ठेवलेली पैशांची बॅग व कागदपत्रे लांबवली होती. या जबरी लूटमारप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांचे पथकाने सदर गुन्ह्याचा छडा लावला. पथकाने शिर्डीसह नाशिक शहर व शिवडे, ता सिन्नर परिसरातून ०४ संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांचे नाशिक शहरातील इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचे ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार (क्र मांक एम एच ०२ बी जे ५३७१) तसेच २ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.
यांना घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यातील आरोपी अरु ण विठ्ठल बांगर (वय ३२, रा. मोहाचापाडा, भिवंडी), विजय तबाजी काळे(वय ३६, रा.त्रिमूर्ती चौक, संगमनेर, जि. अहमदनगर), विकास उर्फ विकी तानाजी चव्हाणके(वय २३, रा. शिवडे, ता. सिन्नर), अमोल रामनाथ माळी (वय २६, रा. शिवडे, ता सिन्नर) यांना ताब्यात घेतले आहे. तर सुमित अविनाश निरभवने, रा. देवळाली, नाशिकरोड हा फरार आहे. या आरोपींसह त्यांचे इतर ३ साथीदार, यातील आरोपी अरु ण बांगर याच्याविरु द्ध ठाणे शहर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील इतर आरोपींविरु द्ध अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: In the possession of the robbery on the Ghoti-Sinnar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.