पावसानंतरही गाळ तसाच रस्त्यावर महामार्गावर अपघाताची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:46 PM2019-11-14T18:46:10+5:302019-11-14T18:47:01+5:30

देशमाने : परतीचा पाऊस थांबल्यानंतर देखील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पाणी काढण्यासाठी चर खोदून पडलेला गाळ अद्यापही पडून असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

The possibility of accident on the highway in the same way even after rain! | पावसानंतरही गाळ तसाच रस्त्यावर महामार्गावर अपघाताची शक्यता!

देशमाने गावालगत अद्यापही महामार्गावर निम्म्या रस्त्यावर चिखलाचा पडलेला खच.

googlenewsNext
ठळक मुद्देदेशमाने : गावालगत सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

देशमाने : परतीचा पाऊस थांबल्यानंतर देखील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पाणी काढण्यासाठी चर खोदून पडलेला गाळ अद्यापही पडून असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
पंधरा दिवसापूर्वी झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच-पाणी झाले होते. देशमाने गावालगत शेतातून वाहणारे पाणी थेट महामार्गावर आले होते. परिणामी वाहतुकीस अडथळे निर्माण झाले होते.
येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महामार्गालगत जेसीबीद्वारे चर खोदण्यात आला होता. त्यामुळे सदर चिखल महामार्गावर निम्म्या रस्त्यावर टाकण्यात आला. अद्यापही चिखल न हटवल्याने त्याचा आता पक्का खच बनल्याने याठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर चिखलाचा खच सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हटवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The possibility of accident on the highway in the same way even after rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.