कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:26 PM2018-10-23T22:26:18+5:302018-10-23T22:27:38+5:30
सायखेडा : कांद्याचे वाढते बाजारभाव लक्षात घेता येणाºया काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असल्याने सायखेडा बाजार समितीच्या परिसरातील कांदा व्यापाºयांनी स्वत:च्या गुदामात कांदा साठवणुकीवर भर दिल्याने आगामी काळात शहरी भागात कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
सायखेडा : कांद्याचे वाढते बाजारभाव लक्षात घेता येणाºया काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असल्याने सायखेडा बाजार समितीच्या परिसरातील कांदा व्यापाºयांनी स्वत:च्या गुदामात कांदा साठवणुकीवर भर दिल्याने आगामी काळात शहरी भागात कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यापासून कांद्याचे भाव गडगडले होते. ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने शेतकºयांनी कांदा विकला होता. जवळपास सात ते आठ महिने भाव ‘जैसे थे’ राहिल्याने शेतकरी पुरता रसातळाला गेला. आर्थिक नुकसान झाल्याने कांद्याचा खर्चसुद्धा फिटला नसल्याने शेतकºयांचे कर्ज वाढत गेले. यावेळी बाजारभाव नसल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या घरच्या चाळीत कांदा साठवणूक केली. पाऊस कमी पडल्याने लाला कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाली.
अनेक व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजार समितीत कांदा खरेदी करत असले तरी त्यांचा कांदा गाड्या भरून बाहेर जात नाही. शहरी भागातील नागरिकांना कांद्याची टंचाई निर्माण होऊन भाव वाढले की गुदामात साठवणूक केलेला कांदा चांगल्या भावात विक्र ी केला जाईल, अशी अशा आहे.
काळ्या मातीत राबणाºया शेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ आली की व्यापारी आणि शहरी भागातील ग्राहकांना त्रास होतो. आज शेतकरी रब्बीच्या हंगामासाठी भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून जवळील कांदा विकत आहे आणि व्यापारी साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करून काही दिवसात बाजारभाव वाढल्यावर लाखो रुपये नफा कमवणार शासन स्तरावर कांदा साठवणुकीवर बंधने आणून शेतकºयांना दिलासा देणार का, असा सवाल शेतकºयांकडून विचारला जात आहे.लाल कांदा विक्र ीसाठी मुबलक प्रमाणात नसल्याने उन्हाळा कांद्याचे भाव काही दिवसांपूर्वी २५०० रुपयांपर्यंत पोहचले होते. जेमतेम आठ दिवस बाजारभाव मिळाला, त्यानंतर पुन्हा १५०० रुपये सरासरी कांदा विक्र होत आहे.
नवीन लाल कांदा बाजारात दाखल झाला तर जुन्या उन्हाळा कांद्याचे भाव कमी होतील, या भीतीने शेतकºयांनी कांदा विक्र ीसाठी आणत असले तरी व्यापाºयांना बाजारभाव पुन्हा वाढतील, अशी शक्यता असल्याने गुदामात कांदा साठवणूक करत आहे.