बागलाण तालुक्यातील भूमिगत पाइपलाइन करून पळविण्याच्या माग वीरगावला पाटपाणी पेटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:04 AM2018-01-07T00:04:04+5:302018-01-07T00:24:03+5:30
वीरगाव : बागलाण तालुक्यातील वीरगाव येथील शेकडो हेक्टर पाटस्थळ जमिनीला दसाणा धरणाचे काही पाणी व पुरपाणी आरक्षित करण्यात येते.
वीरगाव : बागलाण तालुक्यातील वीरगाव येथील शेकडो हेक्टर पाटस्थळ जमिनीला दसाणा धरणाचे काही पाणी व पुरपाणी आरक्षित करण्यात येते. सदर पाणी वनोली तरसाळी व औंदाणे येथे भूमिगत पाइपलाइन करून पळविण्याच्या मार्गात येथील शेतकरी असल्याने पाटस्थळ क्षेत्रातील शेकडो शेतकरी यामुळे अधिकच आक्रमक झालेले आहेत. पाणी विरगावच्या पाटस्थळ क्षेत्राव्यतिरिक्त जाऊ देणार नाही, असा इशारा या लाभार्थी शेतकºयांनी दिला आहे. वीरगावचे शेकडो हेक्टर पाटस्थळ क्षेत्र हे पाण्याअभावी पडितच असते. याक्षेत्राला पाण्याचे अन्य कुठलेही स्त्रोत नसून फक्त पाटाच्या आरिक्षत पाण्याच्या भरवश्यावर या ठिकाणी पिके लावली जातात. सालाबादापासून या क्षेत्रासाठी पाटपाणी येत असते, परंतु हे उर्वरित पाटपाणी आव्हाटी फाटा परिसरात करण्यात आलेल्या खड्ड्यात साठवणूक करून सुकडनाल्याद्वारे वनोली तरसाळी औंदाणे या शिवारासाठी जात होते. मात्र यावर्षी हे पाणी भूमिगत पाइपलाइनद्वारे घेऊन जाण्याचा प्रयत्न काही मंडळी करताना दिसून येत आहे. यामुळेच या पाइपलाइनला तीव्र विरोध करीत वीरगाव येथील शेकडो लाभार्थी शेतकरी एकत्र आले आहेत. यावेळी आयोजित बैठकीला सरपंच रावण नानाजी देवरे, मोठाभाऊ रामभाऊ देवरे, बाजीराव विष्णु देवरे, दिलीप राजाराम देवरे, हेमंत वामन गांगुर्डे, बाबा शिवाजी देवरे, आबा दौलत देवरे, आबा ग्यानदेव देवरे, दत्तात्रेय भिला देवरे, प्रकाश बाळू देवरे, राकेश रावण देवरे, राहुल रावण देवरे तानाजी दादाजी देवरे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.