तिसऱ्या श्रावणी सोमवारी गर्दीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:40 PM2018-08-26T22:40:38+5:302018-08-26T22:41:20+5:30

त्र्यंबकेश्वर येथे तिसºया श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र त्यानंतर भाविकांची वर्दळ सुरु झाली. रात्री उशीरापर्यंत आणि उद्या भाविकांच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज देवस्थान प्रशासनाने वर्तविला असून त्यादृष्टिने प्रशासन सज्ज झाले आहे.

The possibility of a crowd on the third shadow Monday | तिसऱ्या श्रावणी सोमवारी गर्दीची शक्यता

तिसऱ्या श्रावणी सोमवारी गर्दीची शक्यता

Next

श्रावण महिना भगवान शिवाचे व्रतवैकल्ये करण्याचा महिना मानला जातो. सदर उपवास करतांना अगर प्रदक्षिणा करतांना एखादा सोमवार चुकला तरी तिस-या श्रावण सोमवारी उपवास धरुन प्रदक्षिणा परिक्र मा केल्यास चारही सोमवारचे पुण्य पदरी पडते अशी भाविकांची श्रध्दा आहे. म्हणूनच तिस-या श्रावण सोमवारी अफाट गर्दी होत असते. सायंकाळनंतर राज्यासह राज्याबाहेरील भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरु असल्याचे दिसून आले. काही जण सायंकाळीच देवस्थानच्या खोल्यांमध्ये तसेच हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले होते. जव्हार फाटा मेळा स्टँडवर हळुहळु गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून आले. रात्री उशीरा प्रदक्षिणेसाठी भाविकांचा जत्था ‘हर हर भोले’चा गजर करीत अनवाणी येताना दिसत होता. प्रदक्षिणा न करता केवळ भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शना साठी येणारे भाविक मात्र उद्या (दि.२७) दाखल होतील असा अंदाज आहे. तिसºया सोमवारच्या पार्श्वभूमीवर होणीरी गर्दी लक्षात घेता पोलीसांचा फौजफाटा व यंत्रणा सज्ज झाली आहे.

Web Title: The possibility of a crowd on the third shadow Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.