लोकसभेच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता, दानवेंचे पदाधिकाऱ्यांना तयारीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:44 PM2018-08-14T15:44:51+5:302018-08-14T15:51:30+5:30
लोकसभेच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकांच्या तयारीत कोणतीही उणीव राहू, नये यासाठी पेजप्रमुख ते बुथप्रमुखांपर्यंत कार्यकर्ते तयार करा, निधीची काळजी करून नका प्रसंगी गरज पडली, तर कार्येकर्ते हायर करा, तरीही कार्यकर्ते मिळत नसतील तर बाहेरून कार्यकर्ते पाठवतो परंतु कोणत्याही परिस्थिती निवडणुकीच्या तयारी कोणतीही उणीव राहता कामा नये, अशा सूचना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत के ल्या आहेत.
नाशिक : लोकसभेच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकांच्या तयारीत कोणतीही उणीव राहू, नये यासाठी पेजप्रमुख ते बुथप्रमुखांपर्यंत कार्यकर्ते तयार करा, निधीची काळजी करून नका प्रसंगी गरज पडली, तर कार्येकर्ते हायर करा, तरीही कार्यकर्ते मिळत नसतील तर बाहेरून कार्यकर्ते पाठवतो परंतु कोणत्याही परिस्थिती निवडणुकीच्या तयारी कोणतीही उणीव राहता कामा नये, अशा सूचना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत के ल्या आहेत.
नाशिक शहरातीली भाजपाच्या वसंतस्मृती या मध्यवर्ती कार्यालयात रावसाहेब दानवे यांनी बंदद्वार बैठक घेऊन आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नशिक शहर भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनींना निवडणुक तयारीच्या सूचना व्यासपीठावर यावेळी भाजपाचे प्रदेश चिटणीस, सचीव लक्ष्मण सावजी, प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागूल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी. संघटनमंत्री किशोर काळकर आदि उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकजण या बैठकीला अनुपस्थित असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करतानाच जे उपलब्ध होतील त्यांना सोबत घेऊन पक्षाच्या नियोजनानुसार अंतीम मतदारापर्यंत पोहचण्याचे आदेश या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यासाठी आवश्यक तेवढ्या कार्यकर्त्यांची फळी तयार करा, निधीची काळजी करू नका, निधी किती हवा तो मिळवून देतो, प्रसंगी कार्यकर्ते हायर करा परंतु निवडणुकीच्या नियोजनात कोणतीही त्रूट राहता कामा नये, असे निर्देश देतानाच, सर्व कार्यकर्त्यांची यादी व नियोजन लवकरात लवकर तयार करून पक्षाकडे देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्याना दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, देशात एकत्र निवडणुका होण्याची चर्चा सुरू असून ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या दिशेने सरकार एक पाऊल टाकण्याच्या तयारीत असताना रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये पदाधिकारी आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन तयारीच्या सूचना दिल्याने आगामी लोकसभा निवडणुक लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.