पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत उद्योगांना दिलासा मिळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 05:51 PM2018-12-28T17:51:32+5:302018-12-28T17:51:45+5:30
सिन्नर : पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत गांभिर्याने विचार करून सत्कारात्मक पावले उचलली जाणार आहेत. लवकरच उद्योगांना दिलासा मिळणार असल्याची ग्वाही एमएसईबी होल्डिंग कंपनी संचालक विश्वास पाठक यांनी दिली.
सिन्नर : पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत गांभिर्याने विचार करून सत्कारात्मक पावले उचलली जाणार आहेत. लवकरच उद्योगांना दिलासा मिळणार असल्याची ग्वाही एमएसईबी होल्डिंग कंपनी संचालक विश्वास पाठक यांनी दिली.
१ सप्टेंबर २०१८ पासून पॉवर फॅक्टरवर पेनल्टी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात निमा शिष्टमंडळाने एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांची बुधवारी मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. निमातर्फे निमा औदयोगिक धोरण व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार व निमा ऊर्जा समतिीचे अध्यक्ष रावसाहेब रिकबे, स्टाईसचे तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे उपस्थित होते.
निमा शिष्टमंडळाने पॉवर फॅक्टरवर पेनल्टी सहा महिने आकारू नये असे आवाहन केले. जेणेकरून आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी उद्योजकांना पुरेसा वेळ मिळू शकेल. तसेच ज्यांना आकारणी करण्यात आली आहे व आधीच भरली आहे, अशांना परतावा मिळावा या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.