शहर एस.टी बसेस कायमस्वरुपी बंदची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:20 PM2020-09-30T23:20:41+5:302020-10-01T01:18:25+5:30
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने शहर बससेवा चालवावी असा आग्रह धरणाऱ्या राज्य परिनहव महामंडळाने शहरातील बसेस टप्याटप्याने कमी केल्या आणि आता या बसेस कायमस्वरुपी बंद केल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहर बसेस बंद आहेतच यापुढच्या काळात बसेस सुरू करण्याबात महामंडळाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे समजते.
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने शहर बससेवा चालवावी असा आग्रह धरणाऱ्या राज्य परिनहव महामंडळाने शहरातील बसेस टप्याटप्याने कमी केल्या आणि आता या बसेस कायमस्वरुपी बंद केल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहर बसेस बंद आहेतच यापुढच्या काळात बसेस सुरू करण्याबात महामंडळाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे समजते.
गेल्या अनेक वर्र्षापासून राज्य परिवहन महामंडळाकडून शहर बसेस चालविण्यास नकार दिला जात असून महापालिकेनेच शहरातील बसेसे चालविण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. गेल्या सात वर्षात महामंडळाने तर मनपाला अनेकदा अल्टीमेटम देत शहरातील सर्व बसेस बंद करण्याचे निर्वाणीचे पत्र देखील दिलेले आहे. गेल्या दोन वर्षात महामंडळाचे प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरूवात केली असून शहरातील निम्पयाहून अधिक बसेस बंद केल्या देखील आहेत.
यापूर्वी महामंडळाच्या शहरात १२० बसेस सुरू होत्या. टप्पटप्याने या बसेस बंद करून केवळ ४० बसेस शहरात धावत होत्या. कोरोनामुळे सर्वच बसेसे बंद करण्यात आल्यानंतर आपोआपच शहरातील बससेवा देखील बंद करण्यात आली. जिल्हांतर्गत आणि परराज्यात बसेस सुरू झाल्या असल्या तरी शहरातील बसेस मात्र अजूनही बंदच आहेत. कोरोनाचे निमित्त साधून यापुढे या बसेस सुरू करायच्याच नाही असा विचार महामंडळाकडून सुरू झाल्यााचे समजते.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाकष आर्थिक नुकसानीचे कारण देखील आहे. अजूनही महामंडळाला अपेक्षित उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या बसेस सुरू आहेत. त्यांच्यातूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. शासनाने शहरातील बसेस सुरू करण्याचे आदेश दिले तरी नाशिकमध्ये मात्र रस्त्यावर किती बसेस धावतील याची शाश्वती नाही. कोरोनाचे निमित्त साधून बससेवा मनपानेच चालवावी याबाबतचा आग्रह धरण्याची दाट शक्यता आहे; तर कोरोनामुळे मनपाला बससेवेचा खर्च परवडणारा नसल्याचेही कारण मनपाकडून पुढे केले जाण्याची शक्यता आहे.
नाशिक विभागीय एस.टी महामंडळ तसेचही शहरात बसेस चालविण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे कोरोनानंतर होणाºया घडामोडी आणि बदलांमध्ये एस.टी सेवेचा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्य महामंडळ शहर बसेसेवेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे तर मनपाला बसेसेवेसाठी तत्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी लागणार आहे.