पश्चिम वाहिन्यांचे पाणी पळविण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:07 AM2017-08-25T00:07:48+5:302017-08-25T00:08:14+5:30
महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सहविचार सभेचे आयोजन केले असून, त्यात राज्यातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.
नाशिक : महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सहविचार सभेचे आयोजन केले असून, त्यात राज्यातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.
महाराष्टÑ शासनाने जल व सिंचन आयोगाचा अहवाल ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वीकारला असून, जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी त्या अहवालात गोदावरी खोºयात ६६ टीएमसी, गिरणा खोºयात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सुचविले आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविल्यास मुंबई शहरासाठीदेखील ४२ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, असेही त्या अहवालात नमूद केले आहे.
वास्तविक गिरणा व गोदावरी या तुटीच्या खोºयांना पाणी उपलब्ध करणे आवश्यक असल्याने हे संपूर्ण ४२ टीएमसी पाणी गिरणा व गोदावरी खोºयात वळविणे शक्य असले तरी, गेल्या १८ वर्षांत या अहवालाची प्रभावी अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही. उलटपक्षी राज्याचे हक्काचे पाणी अन्य राज्यांत वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.