विभागात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:23 AM2021-05-05T04:23:38+5:302021-05-05T04:23:38+5:30

नाशिक : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी नाशिक विभागात १ लाख १३ हजार ३२० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता असून, महाबिज ...

Possibility of soybean seed shortage in the department | विभागात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

विभागात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

Next

नाशिक : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी नाशिक विभागात १ लाख १३ हजार ३२० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता असून, महाबिज आणि खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाण्याची संख्या पाहता, यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बियाण्याचा अंदाज धरुन नियोजन केले आहे. विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत एकूण १ लाख ५१ हजार ९२ हेक्टर क्षेत्र सोयाबीनसाठी प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी १ लाख १३ हजार ३२० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. कृषी विभागाने जिल्हानिहाय बियाण्याचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांकडे असलेल्या बियाण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. विभागाला महाबिज आणि एनएससीकडून केवळ १७ हजार ५५२ क्विंटल इतकेच बियाणे उपलब्ध होणार आहे तर खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून १८ हजार ७७१ क्विंटल इतके बियाणे उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. उर्वरित सर्व बियाणे शेतकऱ्यांकडून उपलब्ध होण्याचे कृषी विभागाने गृहित धरले आहे. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेले नाही, ज्यांचेे उगवले त्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन कमी आल्याने यावर्षी देशात सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच गेल्या काही दिवसात सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडे किती बियाणे उपलब्ध होईल, याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी कृषी वभागाने शेतकऱ्यांकडून एक लाख चार हजार ८९९ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल, असे गृहित धरले आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडील बियाण्याची उगवण क्षमता आणि त्याची निगा याबाबतही प्रश्न निर्माण होत असल्याने यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘महाबिज’कडून नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक १२,५०० क्विंटल तर धुळे जिल्ह्याला सर्वात कमी ४४१ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.

चौकट-

जिल्हानिहाय प्रस्तावित क्षेत्र आणि आवश्यक बियाणे

जिल्हा क्षेत्र (हे) बियाणे (क्विंटल)

नाशिक ८८२१४ ६६१६०

धुळे १४२०० १०६५०

नंदुरबार १८६७८ १४०१०

जळगाव ३०००० २२५००

Web Title: Possibility of soybean seed shortage in the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.