‘नामको’साठी दोन पॅनलची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:41 AM2018-08-07T00:41:42+5:302018-08-07T00:42:05+5:30

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या स्थानिक बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाल गतिमान झाल्या असून, दोन पारंपरिक पॅनल तयार होण्याची शक्यता आहे. किंबहुना खूपच स्पर्धा वाढली, तर तिसरे पॅनलदेखील होण्याची शक्यता आहे.

 The possibility of two panels for 'Namco' | ‘नामको’साठी दोन पॅनलची शक्यता

‘नामको’साठी दोन पॅनलची शक्यता

Next

नाशिक : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या स्थानिक बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाल गतिमान झाल्या असून, दोन पारंपरिक पॅनल तयार होण्याची शक्यता आहे. किंबहुना खूपच स्पर्धा वाढली, तर तिसरे पॅनलदेखील होण्याची शक्यता आहे.  नाशिक मर्चंट बॅँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून, चार वर्षांपासून बॅँकेवर प्रशासक नियुक्त आहेत. किरकोळ कारणावरून नियुक्त असलेले प्रशासक आता वादग्रस्त ठरू लागले असून, बॅँकेचा एनपीए वाढू लागल्याने बॅँकेच्या बाजी संचालकांनी त्याच्या विरोधात चळवळ सुरू केल्यानंतर आता गेल्याच महिन्यात रिझर्व्ह बॅँकेने जानेवारी महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दिवाळीनंतर यासंदर्भात रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. सध्या वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, जयप्रकाश जातेगावकर, शोभा छाजेड यांचे पॅनल तयार करण्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे ललित मोदी, गजानन शेलार, भास्कर कोठावदे यांच्या पॅनलच्या हालचाली वाढल्या आहेत. तूर्तास दोघांनी बिनविरोध निवडणूका होण्याच्या दृष्टीने भूमिका घेतली असली तरी तशी शक्यता तूर्तास दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. बॅँकेचे सर्वेसर्वा मानल्या जाणाऱ्या (कै.) हुकूमचंद बागमार यांचे चिरंजीव अजित बागमार यांनी पॅनल तयार करण्याची घोषणा केली असली तरी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून हुकूमचंद बागमार यांचे नातू अ‍ॅड. आनंद बागमार यांना गिते साने यांनी पॅनलमध्ये घेण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. बॅँकेच्या राजकारणात दोन्ही पॅनल्सचे समर्थक मोठ्या प्रमाणात असले तरी बॅँकेला प्रशासकमुक्त करण्यात खारीचा वाटा आपण उचलला असे सांगणाºयांची संख्यादेखील मोठी आहे.
तिसरे पॅनल शक्य
हुकूमचंद बागमार आणि त्यांच्या विरोधातील मोदी पॅनल ही पारंपरिक लढत असली तरी त्यावेळी बागमार यांचे निकष आणि त्यांची ‘हुकूमत’ हा वेगळा विषय होता. आता सर्व इच्छुकांना सामावून घेणे दोन्ही पॅनलच्या दृष्टीने शक्य नसून त्याचमुळे तिसरे पॅनलदेखील तयार होण्याची शक्यता आहे.

Web Title:  The possibility of two panels for 'Namco'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.