जिल्ह्यातील टपाल बटवड्याचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:35 AM2020-01-09T00:35:26+5:302020-01-09T00:35:53+5:30

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी बुधवारी (दि.८) पुकारलेल्या देशव्यापी संपात टपाल कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. शहरी भागातील पोस्टमनपासून ग्रामीण डाकसेवकांसह मेल वाहने चालविणारे चालक संपात उतरल्याने शहरासह जिल्ह्याचे टपाल ‘जैसे थे’ पडून होते. दिवसभर आलेल्या टपालाचा बटवडा नाशिक मुख्य टपाल कार्यालयातून अन्य उपकार्यालये, शाखा कार्यालयांपर्यंतदेखील होऊ शकला नाही. तसेच नाशिक टपाल विभागातील एकूण ८३८ कर्मचाºयांपैकी केवळ २११ कर्मचाºयांनी आपापल्या कार्यालयांत हजेरी लावली.

Post jamming operations in the district | जिल्ह्यातील टपाल बटवड्याचे कामकाज ठप्प

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे टपाल कार्यालयात असा शुकशुकाट.

Next
ठळक मुद्देसंपाचा परिणाम : ३२४ पैकी ११९ उपकार्यालयांत कामकाज

नाशिक : सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी बुधवारी (दि.८) पुकारलेल्या देशव्यापी संपात टपाल कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. शहरी भागातील पोस्टमनपासून ग्रामीण डाकसेवकांसह मेल वाहने चालविणारे चालक संपात उतरल्याने शहरासह जिल्ह्याचे टपाल ‘जैसे थे’ पडून होते. दिवसभर आलेल्या टपालाचा बटवडा नाशिक मुख्य टपाल कार्यालयातून अन्य उपकार्यालये, शाखा कार्यालयांपर्यंतदेखील होऊ शकला नाही. तसेच नाशिक टपाल विभागातील एकूण ८३८ कर्मचाºयांपैकी केवळ २११ कर्मचाºयांनी आपापल्या कार्यालयांत हजेरी लावली.
नवीन पेन्शन योजना रद्द करावी, सर्व कर्मचाºयांना अखेरच्या पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम किमान पेन्शनची हमी द्यावी, २०१६ पासून थकलेला घरभाडे भत्ता द्यावा, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीतील सर्व त्रुटी दूर कराव्या, सर्व केंद्र आस्थापनेतील रिक्त असलेली एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी, ग्रामीण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा, ग्रॅच्युईटी ५ लाख करावी, निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचाºयांनी संपात उडी घेतली.
आॅल इंडिया पोस्ट एम्प्लॉईज युनियन, नॅशनल असोसिएशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज, ग्रुप सी, पोस्टमन व ग्रुप डी, आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन अशा तीनही संघटनांच्या सदस्यांनी संपात सहभाग नोंदविला. यामुळे नाशिक शहरातील मुख्य टपाल कार्यालयापासून या कार्यालयांतर्गत येणारी सर्व उपक ार्यालये, शाखा कार्यालयांसह ग्रामीण भागातील टपालाचा बटवडा ठप्प झाला.
सकाळच्या सुमारास टपाल कर्मचाºयांसह पोस्टमन, ग्रामीण डाकसेवकांनी एकत्र येत मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बैठक घेत जोरदार घोषणाबाजी केली.

६२७ कर्मचारी संपात सहभागी
मुख्य टपाल कार्यालयाच्या अखत्यारितील १२३ पोस्टमनपैकी केवळ ३५ पोस्टमन, एमटीएसचे ५७ पैकी १४ तर ग्रामीण डाकसेवक ३८६ पैकी केवळ ७८ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी ४७ सुपरवायझरसह अन्य पदांवरील २२५ अधिकाºयांपैकी ८४ अशा एकूण २११ कर्मचाºयांनी नियमितपणे कर्तव्य बजावले. याव्यतिरिक्त ८३८ कर्मचाºयांनी मात्र संपात सहभागी होणे पसंत केले. परिणामी शहरासह जिल्ह्यातील टपालसेवा प्रभावित झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. नाशिक मुख्य टपाल कार्यालयातील बटवडा कक्षात पोस्टमन नजरेस पडले नाही. संघटनांच्या पदाधिकाºयांनी सुमारे ९२५ पैकी ८०० कर्मचारी संपात सहभागी असल्याचा दावा केला, मात्र प्रवर अधीक्षक कार्यालयाकडून केवळ ६२७ कर्मचारी संपावर असल्याचे सांगितले.

Web Title: Post jamming operations in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.